मराठी बातम्या /बातम्या /देश /

राजकीय सभांवरील निर्बंध 11 फेब्रुवारीपर्यंत कायम, काही बाबतीत मात्र दिलासा; वाचा सविस्तर

राजकीय सभांवरील निर्बंध 11 फेब्रुवारीपर्यंत कायम, काही बाबतीत मात्र दिलासा; वाचा सविस्तर

निवडणुकीच्या प्रचारासंदर्भातील काही निकष शिथिल करण्यात आले असले तरी एकूण निर्बंध हे 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहतील, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 31 जानेवारी: देशात राजकीय सभांवर (Political rallies) घालण्यात आलेली बंदी (Ban) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) कायम ठेवली असून आता 11 फेब्रुवारीपर्यंत (11 February) निर्बंध कायम राहतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र बंदी कायम ठेवताना काही बाबतीत दिलासा (Relief) देण्यात आला असून गर्दीची मर्यादा काहीशी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना अंशतः दिलासा मिळाला असून आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांच्या आयोजनाला जोर येणार आहे.  बंदी कायम, नियमांत शिथिलता केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या निर्देशांनुसार 11 फेब्रुवारीपर्यंत जाहीर सभा आणि प्रचारावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र जाहीर सभांसाठी आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये काहीशी मोकळीक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त 1000 लोकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणच्या एकूण क्षमतेचा निम्मी किंवा 1000 यापैकी जो आकडा कमी असेल, तेवढी उपस्थिती जाहीर सभांसाठी मिळणार आहे. 1 फेब्रुवारीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.  घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सध्याच्या नियमांनुसार जास्तीत जास्त 10 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र यापुढे ही मर्यादा शिथिल करण्यात आली असून 1 फेब्रुवारीपासून जास्तीत जास्त 20 जण घरोघरी जाऊन प्रचार करू शकणार आहेत.  बंद सभागृहातील सभांसाठी सध्या 300 जणांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली होती. ही मर्यादादेखील आता कमी करण्यात आली असून यापुढे 500 लोकांना एकत्र येण्याची परवानगी असणार आहे. एका वेळी हॉलच्या मर्यादेच्या 50 टक्के किंवा 500 यापैकी जो आकडा कमी असेल, तेवढे प्रेक्षक बंद सभागृहातील प्रचारसभांना हजेरी लावू शकणार आहेत.  हे वाचा - कार्यकर्ते लागले तयारीला देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा माहौल आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणीपूर या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारावर कोरोना निर्बंधांमुळे मर्यादा आल्या आहेत. त्यातील काही निकषांमध्ये आता सूट देण्यात आल्यामुळे निवडणूक प्रचारातील उत्साह वाढण्याची चिन्हं आहेत.
First published:

Tags: Corona virus in india, Election, Election commission

पुढील बातम्या