निवडणूक आयोग झोपलं होतं का ? 'मोदी की सेना' वर सुप्रीम कोर्टाचा सवाल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली पण निवडणूक आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळेच सुप्रीम कोर्टाने आयोगाला खडसावलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 02:47 PM IST

निवडणूक आयोग झोपलं होतं का ? 'मोदी की सेना' वर सुप्रीम कोर्टाचा सवाल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली पण निवडणूक आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळेच सुप्रीम कोर्टाने आयोगाला खडसावलं आहे. ही वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर निवडणूक आयोग काय झोपलं होतं का, असा सवाल कोर्टाने केला आहे.

मोदी की सेना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख 'मोदीजी की सेना' असा केला होता. त्याचबरोबर, 'जर तुम्हाला अली वर विश्वास असेल तर आमचा बजरंगबलीवर विश्वास आहे', असंही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. पण या दोन्ही वक्तव्यांप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली नाही.

मुस्लिमांना आवाहन

बसपाच्या नेत्या मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर आणि बरेली जिल्ह्यात मुस्लीम मतदारांना आवाहन केलं होतं. मतांचं विभाजन होण्यापासून सावध राहा, असा इशाराच त्यांनी दिला होता. यानंतर, आपण हे वक्तव्य बहुजन समाजाला उद्देशून केलं, मुस्लिमांना नाही, अशी सारवासारव मायावतींनी केली. पण त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही.

Loading...

जयाप्रदांबदद्ल वादग्रस्त वक्तव्य

योगी आदित्यनाथ आणि मायावतींचं हे वक्तव्य चर्चेत असतानाच आझम खान यांनी जयाप्रदांबदद्ल केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला आहे.

प्रचारमोहिमांमध्ये केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने अशा वक्तव्यांवर कारवाई करण्याचं गांभीर्य सगळ्यांच्या समोर आणलं.

आयोगाला अधिकार किती ?

एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याला याबद्दल कोर्टाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाचे अधिकार मर्यादित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षा तपासून पाहण्यात येतील, असं कोर्टाने म्हटलं आहे.

एखाद्या प्रकरणाची दखल घेताना आम्हाला विशिष्ट अधिकार आहेत पण आम्ही एखाद्या व्यक्तीला अपात्र ठरवू शकत नाही, असं उत्तर निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी दिलं.तरीही एखाद्या व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्य केलं असेल तर त्यावर आयोगाने कारवाई करायलाच पाहिजे,असं कोर्टाने म्हटलं आहे.

===================================================================================================================================================================

VIDEO: जयाप्रदांविरोधात आधी आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर सारवासारव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2019 02:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...