• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • निवडणूक आयोगाचा दणका; साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर 72 तास प्रचारबंदी!

निवडणूक आयोगाचा दणका; साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर 72 तास प्रचारबंदी!

शहीद हेमंतर करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर 72 तास प्रचारासाठी बंदी घालण्यात आली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 01 मे : शहीद हेमंतर करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वादात अडकलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर 72 तास प्रचारासाठी बंदी घालण्यात आली आहे. बाबरी मशिदीबद्दलच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. भाजपने त्यांना मध्य प्रदेशातील भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.' यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की, 'आम्ही मंदिर बांधणार. शेवटी (बाबरी मस्जिद)ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो'. साध्वींनी केलेल्या विधानावर आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरावर आयोगाचे समाधन न झाल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी बाबरी मस्जिदसंदर्भात आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकत म्हटलं की, ' मी बाबरी मशिदीवर चढून ती पाडण्यासही मदत केली होती. मी चढाई करून ढाचा तोडला. हे काम करण्यासाठी देवानं मला संधी दिली, याचा मला अभिमान आहे. मला शक्ती मिळाली आणि मी ते काम पूर्ण केलं. आता त्याच जागेवर राम मंदिर उभारणार. त्याआधी त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यंदाच्या निवडणुकीतील ही पहिली बंदी नाही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा प्रमुख मायावती आणि अझम खान यांच्यावर आयोगानं प्रचारबंदी घातली होती. आयोगाने योगी आदित्यनाथ यांना 72 तास तर, मायावती यांच्यावर 48 तास प्रचारबंदी घातली होती. प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी भडकाऊ भाषणं केली होती. त्याची दखल आता निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. योगी आदित्यनाथ हे भाजपचे तर, मायावती या बसपा - सपा आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत. SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट
  First published: