News18 Lokmat

आता राजकीय पक्षांना पाळावा लागेल हा नवीन नियम; निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोगाने शनिवारी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी एक नवा नियम जारी केला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 08:56 PM IST

आता राजकीय पक्षांना पाळावा लागेल हा नवीन नियम; निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली 16 मार्च  : निवडणूक आयोगाने शनिवारी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी एक नवा नियम जारी केला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही. मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो. मतदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव असू नये यासाठी हा नियम गेल्या काही निवडणुकांदरम्यान पाळण्यात येत आहे.Loading...


याच नियमाचा एक भाग म्हणून कुठल्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं पत्र निवडणूक आयोगाने शनिवारी सगळ्या पक्षांना पाठवलं.

पूर्वीच्याच नियमाचा हा भाग आहे, हे स्पष्ट करत आयोगाने अशा प्रकारे आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे.

निवडणुकीची आचारसंहिता तुम्हालाही लागू, 'या' गोष्टी केल्यात तर होईल तुरुंगात रवानगी


Loksabha Election 2019 : निवडणुकीमध्ये सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या...


देशात आचारसंहिता लागू झालीय. त्यामुळे देशभरात राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर काढली जातायत. आचारसंहितेचं कुणी उल्लंघन केलं तर 1095 या हेल्पलाइनवर तुम्ही संपर्क करून सांगू शकता. 100 मिनिटांच्या आत कारवाई होईल.

आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सरकारी कामं बंद होणार, असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल.


आचारसंहितेमुळे या गोष्टींवर येणार बंदी


1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद


2. नव्या कामांचा स्वीकार बंद


3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत


4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत


5. सरकारी वाहनांना सायरन नाही


6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील


7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.


8. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत


9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.


10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा.


हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार. तुम्ही एखाद्या नेत्याचा प्रचार करत असाल, तरीही तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही. तुरुंगवास होऊ शकतो.

दरम्यान 7 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी आता आचारसंहिता देखील जाहीर झाली आहे. निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

SPECIAL REPORT : पवारांच्या घरात नेमकं चाललंय तरी काय?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...