Coronavirus : तंबाखू-गुटखा खाऊन थुंकलात तर होणार 6 महिन्यांचा कारावास

Coronavirus : तंबाखू-गुटखा खाऊन थुंकलात तर होणार 6 महिन्यांचा कारावास

पान मसाला, खैनी, जर्दा आणि गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमुळे कोरोना व्हायरसचा धोका वाढू शकतो.

  • Share this:

पटना, 09 एप्रिल : तंबाखू आणि गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी पिंक टाकणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी आईसीएमआरने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. ज्यामध्ये पान मसाला, खैनी, जर्दा आणि गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमुळे कोरोना व्हायरसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हे संक्रण रोखण्यासाठी पिंक टाकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

बिहारमध्ये पहिल्यापासूनच आहे पानवर बंदी

पान मसाल्यात मॅग्नेशियम कार्बोनेट निकोटीन सापडल्यामुळे बिहार सरकारनं आधीच पान विकण्यावर बंदी आणली होती.15 ब्रँडच्या पान मसाल्यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी आणली आहे. खरं तर, कोरोना व्यतिरिक्त, जीवघेणा एन्सेफलायटीस, क्षयरोग, स्वाइन फ्लू इत्यादींचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

हे वाचा-'आणखी मृतदेह नको असतील तर...', ट्रम्प यांच्या टीकेवर WHOचा पलटवार

भारतीय दंड संहिता कलम 268 आणि 269 नुसार जर एखाद्या व्यक्तीने साथीच्या आजाराच्या बाबतीत दुर्लक्ष केले किंवा कायद्याच्या विरोधात कोणती कृती केली ज्यामुळे इतर नागरिकांना संसर्ग होऊ शकतो, तर त्याला 6 महिने तुरूंगवासाची शिक्षा आणि 200 रुपये दंड ठोठावला जाऊ जाणार आहे. सरकारी कर्मचारी आणि खासगी कार्यालयांमध्ये सुद्धा पान खाऊन पिंक टाकणं किंवा थुंकण्यावर बंदी आणली आहे. असं केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्यानं किंवा त्या कार्यालयातील व्यक्तीनंही या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याविरोधात पोलिसांतर्फे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे.

बिहारप्रमाणे इतर राज्यांमध्येही जर हा नियम लागू केला तर संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीर आता इतर राज्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे वाचा-लोकांच्या जीवाशी का खेळतोय चीन? आणखी एका देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 9, 2020, 10:01 AM IST

ताज्या बातम्या