सिडनी 24 फेब्रुवारी : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला हवी आहे ती मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्य. सततची धावपळ, कामाचा ताण, जीवघेणी स्पर्धा आणि कधीही न संपणाऱ्या गरजा यामुळं आयुष्यात ताण-तणाव प्रचंड वाढला आहे. या ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो. मात्र आहारावर लक्ष केंद्रीत केलं तर मानसिक आरोग्य आणि शांतता मिळते असं ऑस्ट्रेलियात केलेल्या एका संशोधनात आढळून आलंय.
जंक फुड, मैद्याचं जास्त असलेलं प्रमाण आणि प्रक्रिया केलेलं अन्न यामुळे जगभर आरोग्याची समस्या निर्माण झालीय. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये तर लठ्ठपणाची मोठी समस्या निर्माण झालीय. शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करता येईल यावर ऑस्ट्रेलियात एक संशोधन करण्यात आलं. त्याचे निष्कर्ष अतिशय महत्त्वाचे आहेत.
ताजी फळ, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात पुरेसा वापर केला तर तुमचं मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहातं असं संशोधकांना आढळून आलंय. तब्बल 40 हजार जणांवर काही महिने प्रयोग करण्यात आला आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या लोकांनी आपल्या जेवणात ताजी फळं आणि भाज्यांचा भरपूर उपयोग केला त्यांच आरोग्य हे फळे आणि भाज्या न खाणाऱ्या लोकांपेक्षा जास्त चांगलं असल्याचं आढळून आलंय.
Blues-berries.
— World Economic Forum (@wef) February 24, 2019
📖 Read more: https://t.co/sCdQHh7T4c #health pic.twitter.com/LzYNAgd4ZV
काय केलं पाहिजे?
दररोजच्या जेवणातला एक भाग हा फळं आणि भाज्यांसाठी ठेवला पाहिजे.
आपल्या भागात मिळणारी त्या त्या ऋतूंमध्ये येणारी फळं दररोजच्या आहारात आसावीत.
फळं खाताना ती कच्ची आणि प्रक्रिया न करता खाल्ली तर ते अधिक चांगलं असल्याचं आढळून आलंय.
हिरव्या पालेभाज्यांमुळं जीवनसत्व आणि ऊर्जा मिळत असते.
तीच ती फळं किंवा भाज्या न खाता विविध फळं प्रकारची चवीची फळ,भाज्या खाल्ल्याने जास्त फायदा होतो.
रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता उत्पादन केलेली फळं ही चवीला सर्वोत्तम असतात.
या आहाराबरोबरच दररोज नियमित चालणं, मेडिटेशन आणि मोजकं पण सकस खाणं यामुळं मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहू शकते. मनसिक आरोग्य उत्तम असेल तर अर्ध्या समस्या दूर होतात असंही या संशोधकांचं मत आहे.
VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला