मराठी बातम्या /बातम्या /देश /चक्क चॉकलेट खाऊन सुधारेल जनावरांचं आरोग्य; काय आहे रेसिपी?

चक्क चॉकलेट खाऊन सुधारेल जनावरांचं आरोग्य; काय आहे रेसिपी?

चॉकलेट

चॉकलेट

प्राण्यांसाठी चॉकलेट बनवण्याची आणि जनावरांना खायला घालण्याच्या पद्धतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी :  उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये तरुणांसाठी एक खास उपक्रम राबवला जात आहे. सहारनपूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी आय. के. कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विज्ञान केंद्र परिसरात ग्रामीण भागातील तरुणांसाठी पाच दिवसीय स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये 40 वर्षांखालील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणात प्राण्यांसाठी चॉकलेट बनवण्याची आणि जनावरांना खायला घालण्याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती तरुणांना दिली जात आहे.

  कुशवाह यांनी सांगितलं की, ग्रामीण भागात जनावरांना पुरेशी पोषक तत्त्व असलेला आहार मिळत नाहीत. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यातील ऊर्जा, प्रथिने, खनिजे, मीठ इत्यादींच्या प्रमाणाबाबत ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये माहितीचा अभाव आहे. म्हणून विशेष उपक्रम आयोजित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, जनावरांची गर्भधारणा ही ग्रामीण भागातील जनावरांशी संबंधित मुख्य समस्या आहे. गर्भधारणेदरम्यान सुमारे पाच महिन्यांनंतर, हे चॉकलेट गरोदर जनावरांसाठी महत्त्वाचं आहे. त्याच्या माध्यमातून त्यांना सर्व पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.

  हेही वाचा -   Video : दर्शनासाठी लांबच लांब रांग, मग झालं असं काही की महिला थेट पोहोचली आत

  जनावरांसाठी चॉकलेट तयार करण्याची कृती

  पशुतज्ज्ञ डॉ. मनोज सिंह यांनी सांगितलं की, जनावरांसाठी चॉकलेट बनवण्यासाठी सहा गोष्टी आवश्यक असतात. गव्हाचा कोंडा, युरिया, मोलॅसिस (उसाची मळा), सिमेंट, खनिज मिश्रण आणि मीठ यापासून बनवलं जातं. चॉकलेट बनवताना हे घटक किती प्रमाणात वापरायचे हे देखील निश्चित करण्यात आललें आहे. 40 टक्के गव्हाचा कोंडा, 38 टक्के मोलॅसिस, 10 टक्के युरिया, 10 टक्के सिमेंट, 1 टक्का मीठ आणि 1 टक्का खनिज यांच्या मिश्रणापासून हे चॉकलेट तयार केलं जातं. दोन लिटर पाण्यात पाच किलो सिमेंट आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्या जातात. त्यात कोंडा मिसळल्यानंतर दोन-दोन किलो मिश्रण मशिनमध्ये टाकून प्रेस केलं जातं. त्यानंतर ते आठवडाभर वाळवलं जातं.

  " isDesktop="true" id="834925" >

  हे चॉकलेट जनावरांना कसं खायला द्यावे

  शेतकऱ्यांनी हे चॉकलेट एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या जनावरांना खायला द्यावं, असं डॉ. मनोज सिंह यांनी सांगितलं. एकावेळी 300 ग्रॅमपर्यंत हे चॉकलेट दिलं तर त्याचा दुभत्या जनावरावर जास्त परिणाम होतो. या चॉकलेटच्या वापरामुळे जनावरांच्या दुधाचं प्रमाण वाढते. डॉ. मनोज यांनी सांगितलं की, गर्भधारणेदरम्यान ज्या जनावराचं गर्भाशय बाहेर येतं त्यांच्यासाठी हे चॉकलेट खूप उपयुक्त आहे. गर्भाशय बाहेर येण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चॉकलेट उपयुक्त आहे. यासोबतच जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं.

  आयबीआरआय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं विकसित केली आहे ही चॉकलेट रेसिपी

  डॉ. मनोज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चॉकलेट तयार करण्याची पद्धत बरेलीतील आयबीआरआय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं विकसित केली आहे. हीच पध्दत वापरून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे चॉकलेट बनवलं जात आहे. स्वयंरोजगार योजनेंतर्गत तरुणांना याचं प्रशिक्षणही दिलं जात आहे.

  First published:
  top videos

   Tags: Farmer, Local18, Other animal, Uttar pardesh, Viral