नोएडा, 29 सप्टेंबर : गुटखा खाऊन कारमधून थुंकणे हे एका तरुणाच्या जीवावर बेतले. ग्रेटर नोएडामध्ये गुरुवारी सुसाट वेगात निघालेल्या जॅग्वार कारमधून गुटखा थुंकण्यासाठी या तरुणाने डोकं बाहेर काढलं त्यावेळी कारवरच नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हाडेडला धडकली.यात डोक़्याला मार लागून तरुणाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्पेस वे वरून झिरो पाॅईंटजवळ हा अपघात घडलाय तरुणाचं नाव प्रशांत आहे. तो 27 वर्षांचा असून प्रॉपर्टी डिलर होता. आपल्या जग्वार कारमधून तो सुसाट जात होता. कार झिरो पाॅईंटजवळ आली तेव्हा त्याने गुटखा खाऊन थुंकण्यासाठी काच खाली करून डोकं बाहेर काढलं. त्यावेळी रोडच्या बाजूला असलेल्या लोखंडी राॅडला त्याचं डोकं आदळलं.
घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, जग्वार कार खूप वेगात होती. यमुना एक्स्प्रेस वेवरून तो ग्रेटर नोयडाकडे जात होता. जवळपास 120 किमी प्रति तास इतकी गाडीचा स्पिड असावा, अचानक त्याने गुटखा-पान थुंकण्यासाठी डोकं बाहेर काढलं. त्यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली.
प्रशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी तिथून जाणाऱ्या एका कारमध्ये त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाकल करण्यात आलं. शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
VIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा