नवी दिल्ली, 21 मार्च : भारताच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरशिवाय हिमाचल, राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.7 इतकी आहे.
Earthquake tremors felt in Delhi. Details awaited. pic.twitter.com/Hs0A6BUEiU
— ANI (@ANI) March 21, 2023
रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी अफगाणिस्तानपासून 90 किमी अंतरावर असलेल्या कालफगन येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाची दाहकता दाखवणारे व्हिडिओ
Video : राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, घरातील वस्तूंची पडझड#delhi #earthquake pic.twitter.com/2jUWWqaGYV
— News18Lokmat (@News18lokmat) March 21, 2023
भुकंपावेळी हे करू नका
1) तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर एखाद्या मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्यावा.
4) जर तुम्ही कार चालवत असाल तर शक्य तितक्या लवकर कार थांबवावी आणि कारमध्येच बसून राहावं5) आपली कार उड्डाणपूल, ब्रीज, इमारतीच्या बाजूला उभी करू नये.
6) आपण जर ढिगाराखाली दबले गेला असला तर माचिस, लायटर पेटवू नये.तसंच कोणतीही वस्तू हटवण्याचा प्रयत्न करू नये.
7) ढिगाराखाली अडकल्यावर एखाद्या पाईप अथवा भिंतीवर थाप मारत राहावी, जेणे करून बचावपथकाला तुमचं ठिकाण कळू शकेल.
जर तुमच्याकडे शिट्टी असेल तर ती वाजवावी. जर कोणताही पर्याय नसेल तर जोरात मदतीसाठी हाक मारावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.