दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली, गेल्या 50 दिवसांमध्ये बसले 5 धक्के!

दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली, गेल्या 50 दिवसांमध्ये बसले 5 धक्के!

दिल्लीसोबतच हरियाणा, पंजाब या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूगर्भातल्या प्लेट्सची हालचाल होत असल्याने असे धक्के जाणवतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 29 मे: राजधानी दिल्लीत आज पुन्हा एकदा भूकंपाटा झक्का बसला. रिश्चट स्केलवर याची तीव्रता 4.6 एवढी मोजण्यात आली आहे. धक्के जाणवल्याने लोक घाबरून घाराबाहेर आहे. सुदैवाने कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. गेल्या 50 दिवसांमध्ये बसलेला भूकंपाचा हा 5वा धक्का आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी काही धक्के बसू शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

हरियाणातल्या रोहोतकमध्ये या भूकंपाचं केंद्र होतं. चिंतेची बाब म्हणजे जमिनीखाली फक्त पाच किलोमीटर अतरावर हे भूकंप केंद्र होतं असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जमिनीच्या जेवढं वर हे केंद्र असेल तेवढा धोका जास्त असतो असं म्हटलं जातं.

दिल्लीसोबतच हरियाणा, पंजाब या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूगर्भातल्या प्लेट्सची हालचाल होत असल्याने असे धक्के जाणवतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

या आधी पहिल्यांदा 13 एप्रिलला 3.5 तीव्रतेचा त्याचं केंद्र जमिनीत 8 किलोमीटर होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 14 एप्रिलला 2.7 कमी तीव्रतेचा, त्यानंतर  10 मे रोजी 3.5, त्यानंतर  15 मे चौथ्यांना भूकंप आला होता. आणि आज पाचव्यांदा धक्के जाणवले आहेत.

First published: May 29, 2020, 10:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading