मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्का; संपूर्ण ईशान्य भारत हादरला

मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्का; संपूर्ण ईशान्य भारत हादरला

मणिपूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे या राज्यासह संपूर्ण ईशान्य भारत हादरला.

  • Share this:

गुवाहाटी, 25 मे : मणिपूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे या राज्यासह संपूर्ण ईशान्य भारत हादरला. रिश्टर स्केलवर 5.5 तीव्रता दाखवणाऱ्या या भूकंपाने मोठं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. पण या भूकंपाचे हादरे आसामच्या गुवाहाटीपासून अनेक मोठ्या शहरांत जाणवले. मोइरंग या मणिपूरमधल्या छोट्या शहराच्या पश्चिमेला 15 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सेसमॉलॉजीने (NCS) दिली.

मणिपूरच्या चूरचंडपूर जिल्ह्यात या भूकंपचा केंद्रबिंदू होता. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम या राज्यांतही या भूकंपाचे हादरे जाणवले.

न्यूझीलंडमध्ये काही तासापूर्वीच 5.9 क्षमतेचा भूकंप झाला होता. आता भारतातही भूकंप झाल्याने त्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा अभ्यास सुरू आहे.

पंतप्रधानांची Live मुलाखत सुरू असतानाच भूकंपाचा धक्का, नंतर काय झालं पाहा VIDEO

संसर्गाच्या 11 दिवसानंतर पॉझिटिव्ह रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही

विमान प्रवास करायचाय? 14 दिवस क्वारंटाइन झालं बंधनकारक; हे आहेत नवे नियम

First published: May 25, 2020, 9:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading