भूकंपाच्या धक्क्याने अंदमान निकोबार बेट हादरलं

भूकंपाच्या धक्क्याने अंदमान निकोबार बेट हादरलं

अंदमान निकोबार बेटावर भूकंपाचे हादरे बसले आहेत.

  • Share this:

अंदमान निकोबार, 23 मार्च : अंदमान निकोबार बेटावर भूकंपाचा हादरा बसला आहे.  5.1 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा हा भूकंप होता. तर हा मध्यम स्वरुपाचा हा हादरा असल्याचं सांगण्यात येत आहे. पाऊने पाचच्या दरम्यान अंदमानच्या या बेटांवर भूकंपाचे हादरे जाणवले असल्याची माहिती एएनआय या वृत्ताकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यात कोणतीही हानी झाली असल्याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. तर सुरक्षा रक्षक परिसरात मदतीसाठी दाखल झाले आहेत.

याआधी 11 मार्च रोजीदेखील अंदमान निकोबार इथे भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्याची तीव्रता 4.8 रिस्टर स्केलवर इतकी होती. सकाळी सहाच्या सुमारास आलेल्या या भूकंपाच्या हादऱ्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्याता आता पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवल्याने परिसरात मोठं भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, 17 जानेवारीलादेखील अंदमान निकोबारच्या बेटांवर भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्याची तीव्रता 6.6 रिस्टर स्केलवर इतकी होती


या हादऱ्यांती तीव्रता मध्यम असली तरी हादरे जाणवता घरातील लोकांनी बाहेर धाव घेतली. तर सुरक्षा रक्षक आता जागोजागी दाखल झाले आहे. या हादऱ्यांमुळे कुठे हानी तर झाली नाही याची आता तपासणी करण्यात येत आहे.


2004 मध्ये अंदमान निकोबार बेटांवर मोठा भूकंप होऊन त्या पाठोपाळ त्सुनामीचं संकट आलं होतं. यामध्ये या बेटांचा नकाशाच बदलून गेला होता. अनेक बेटं पाण्याखाली गेली होती. वास्तविक हा भूकंप सुमात्रा बेटांपाशी हिंदी महासागरात झाला होता. पण त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 9 पेक्षाही जास्त होती. त्यामुळे प्रचंड उंचीच्या लाटा उसळून त्सुनामी आली होती. यात बेटांवर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: earthquake
First Published: Mar 23, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या