पालघरनंतर राजधानी दिल्लीही हादरली भूकंपाच्या धक्क्याने

पालघरनंतर राजधानी दिल्लीही हादरली भूकंपाच्या धक्क्याने

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोकांमध्ये काही काळासाठी भीती पसरलेली पाहायला मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : दिल्ली आणि उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसले आहेत. राजधानी दिल्लीतील भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोकांमध्ये काही काळासाठी भीती पसरलेली पाहायला मिळाली.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये भूकंप झाल्याची घटना ताजी असतानाच आता दिल्लीतही भूकंपाचे धक्के बसले आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानातील हिंदकुश इथंही भूकंपाचे धक्के बसले आहेत. तेथील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी आहे.

पालघरमधील भूकंप

तलासरी अणि डहाणू तालुक्यात 1 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे 4 धक्के बसले. शुक्रवारी दुपारी 2.06 वाजता बसलेला धक्का आजपर्यंतचा सर्वात मोठा म्हणजेच 4.1 रिश्टर स्केलचा आहे. या भूकंपांचा केंद्रबिंदू 5 किलोमीटर खोलीवर आहे.

पहिला धक्का सकाळी 6.58 वाजता, 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा बसला होता. दुसरा धक्का सकाळी 10.03 वाजता, 3.5 रिश्टर स्केलचा (तुलनेने अधिक) होता. तिसरा धक्का लगेचच सकाळी 10.29 वाजता 3.0 रिश्टर स्केलचा बसला आणि त्यानंतर दुपारी 2.06 वाजता 4 था धक्का बसला. या सर्व भूकंपांचा केंद्रबिंदू अक्षांश 20.0 N आणि रेखांश 72.9 E असाच होता. या आधीच्या भूकंपाचे केंद्रबिंदू इथंच होते.

यातील पहिला भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला तर दुसरा, तिसरा आणि चौथा भूकंप 5 किलोमीटर खोलीवर होता.

VIDEO : भूकंपाच्या 7 हादऱ्यांनंतर या कोरड्या पडलेल्या बोअरवेलला लागलं धो धो पाणी

First published: February 2, 2019, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading