दिल्लीत भूकंप! केंद्रबिंदू पाकिस्तानात

दिल्लीत भूकंप! केंद्रबिंदू पाकिस्तानात

दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतात दुपारी 4.30 च्या सुमारास भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.8 एवढी होती, अशी माहिती मिळाली आहे. अजूनपर्यंत या भूकंपात कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतात दुपारी  4.30 च्या सुमारास भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.8 एवढी होती, अशी माहिती मिळाली आहे. अजूनपर्यंत या भूकंपात कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. पाकिस्तानात रावळपिंडीपासून 92 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. लोक घराच्या आणि ऑफिसच्या बाहेर पळत आले.

उत्तर भारतात पंजाब आणि हरियाणात हा भूकंप जाणवला. पाकिस्तानात जास्त मोठे धक्के जाणवले. तिथल्या पंजाब प्रांतात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने मोठं नुकसान झालं आहे.

पाकिस्तानात इस्लामाबादसह रावळपिंडी, पेशावर, लाहोर आदी ठिकाणी धक्का जाणवला. पाकिस्तानात नुकसान झालं आहे का आणि किती याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

सविस्तर वृत्त येत आहे.

फ्रान्सिस दिब्रिटोंच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेचा तीव्र विरोध, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading