मराठी बातम्या /बातम्या /देश /Breaking: राजस्थानात भूकंपाचे झटके, बिकानेरमध्ये पसरली घबराट

Breaking: राजस्थानात भूकंपाचे झटके, बिकानेरमध्ये पसरली घबराट

राजस्थानच्या बिकानेरचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. रविवारी संध्याकाळी आलेल्या या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

राजस्थानच्या बिकानेरचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. रविवारी संध्याकाळी आलेल्या या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

राजस्थानच्या बिकानेरचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. रविवारी संध्याकाळी आलेल्या या भूकंपाने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

बिकानेर, 12 डिसेंबर: राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake in Rajasthan) जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट (Fear) पसरल्याचं चित्र होतं. रविवारी संध्याकाळच्या (Sunday evening) सुमाराला अचानक घरांमध्ये (Earthquake) हादरे जाणवायला सुरुवात झाली. भूकंपाची जाणीव झाल्यानंतर लोक घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. काही वेळ भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यानंतर हादरे बंद झाले. राजस्थानच्या बिकानेर भागात (Bikaner area) भूकंपाची सर्वाधिक तीव्रता जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

संध्याकाळी जाणवले हादरे

रविवारी संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.    भूकंपाचे झटके जाणवताच लोक आपापल्या घरातून बाहेर आले आणि मोकळ्या मैदानात धावू लागले. भूकंप मोठा असेल, तर घरांची पडझड होऊन आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता घेऊन नागरिक मोकळ्या जागांमध्ये आसरा घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

नुकसान नाही

भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल म्हणजेच तुलनेनं कमी असल्यामुळं अद्याप कुठेही जीवितहानीची नोंद झालेली नाही. आर्थिक नुकसान झाल्याचीही बातमी अद्याप समोर आलेली नाही. मात्र या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

First published:
top videos

    Tags: Earthquake, Rajasthan