S M L

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताचं एक विमान पाडलं : सुषमा स्वराज

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतात त्यांचं विमान घुसवलं असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केल्याचे एएनआयने म्हटले आहे.

Updated On: Mar 24, 2019 01:23 PM IST

एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताचं एक विमान पाडलं  : सुषमा स्वराज

नवी दिल्ली, 24 मार्च : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी एका कार्यक्रमात बोलताना एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाकचे एक विमान पाडले तर त्यांनीही भारताचे एक विमान पाडल्याचे म्हटले. यापूर्वी पाकिस्तानने भारताचं विमान पाडल्याचा दावा केला होता. मात्र भारताने तो दावा फेटाळून लावला होता.




याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सुषमा स्वराज म्हणाल्या की, एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने उत्तरादाखल कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांची विमाने भारताच्या हद्दीत घुसली. तेव्हा भारताने त्यांचे एक विमान पाडले तर त्यांनी आपले एक विमान पाडले. यात भारताचा एक वैमानिक पाकिस्तानने पकडला. यावेळी भारताने कूटनितीचा वापर करत फक्त दोन दिवसांत वैमानिकाला भारतात आणले.

दरम्यान, भारताचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना पाकिस्ताननं दावा केला होता की त्यांनी भारताची दोन विमानं पाडली. हा दावा खोडून काढत भारताने म्हटलं होतं की, प्रत्यक्षात भारताचं एकच विमान होतं आणि तेही त्यांच्या एफ-16 ला लक्ष्य करताना पडलं होतं. ज्यामधे विंग कमांडर अभिनंदन होते.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या तळांना नेस्तनाबूत केलं होतं. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 1 हजार किलो बॉम्ब फेकले. तेव्हा पाकिस्तानने भारतात विमान घुसवण्याचा प्रयत्न केला पण भारताने त्यांना पिटाळून लावले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 01:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close