Home /News /national /

रेल्वे तिकिटांचा घोटाळा करणाऱ्या 7 जणांना अटक, वर्षाला कमवायचे 100 कोटी

रेल्वे तिकिटांचा घोटाळा करणाऱ्या 7 जणांना अटक, वर्षाला कमवायचे 100 कोटी

भारतीय रेल्वेच्या तिकिटांमध्ये ऑनलाइन घोटाळा करणाऱ्या आणखी 7 जणांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ताब्यात घेतलं आहे.

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारतीय रेल्वेच्या तिकिटांमध्ये ऑनलाइन घोटाळा करणाऱ्या आणखी 7 जणांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ताब्यात घेतलं आहे. अनधिकृत तिकिट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिकिटे काढली जात होती असा आरोप त्यांच्यावर आहे. अटक केलेल्यांपैकी मास्टरमांइंड हा कोलकात्याचा आहे. जयंत पोद्दार असं त्याचं नाव आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार पोद्दार जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. याशिवाय इतर दोन आरोपींना सुरत आणि अहमदाबादमधून पकडण्यात आलं तर राजेश यादव मुंबईत आणि शमशेरला लखनऊत पकडलं. गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन तिकिटाचा काळाबाजर रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. डिसेंबरपासून आतापर्यंत 60 जणांना ताब्यात घेतलं आहे. पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर यांचा समावेश आहे. हे इंजिनिअर सॉफ्टवेअरच्या मदतीने तिकिट बूक करत होते. त्यांची वार्षिक उलाढाल 50 ते 100 कोटी इतकी होती. आरपीएफचे संचालक अरुण कुमार यांनी सांगितलेकी, कोलकात्यातून अटक केल्लाय जयंत हवाला ऑपरेटर्स आणि बनावट चलन तयार करणाऱ्या रॅकेटमध्येही होता. त्याचे धागेदोरे फेक पासपोर्ट आणि खोटं आधारकार्ड तयार करण्यापर्यंत सापडल्याचंही अरुण कुमार यांनी सांगितलं. एएनएमएस, मॅक आणि जग्वार यांसारखी अनधिकृत सॉफ्टवेअर आयआरसीटीसीच्या लॉगइन कॅप्चा, बुकिंग कॅप्चा आणि बँक ओटीपी याशिवाय तिकिट बुक करायचे. ग्राहकाला ही सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे एक तिकिट बुक करण्यासाठी तीन मिनिटांचा कालावधी लागतो पण अशा सॉफ्टवेअरमुळे दीड मिनिटात तिकिट बुक करायचे. रेल्वेची तात्काळ तिकिटं बुक करण्याची परवानगी कोणत्याच एजंटला नाही. सुरतमधून पकडण्यात आलेला आरोपी अमित प्रजापती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तो मॅक तात्काळ तिकिट सॉफ्टवेअरचा विक्रेता आहे. देशभरात तो सॉफ्टवेअर आयडी डिस्ट्रिब्युट करायचा. त्याच्याकडे जवळपास 37 हजार पेक्षा जास्त बुक केलेली इ तिकिटे सापडली. यापैकी 8 हजार वैध होती ज्यांची विक्री होणार होती. या तिकिटांची किंमत 2.59 कोटी रुपये इतकी आहे. आता ही तिकिटे ब्लॉक केली जातील. वाचा : 'दोन महिन्यांपूर्वी प्रियकराला मारून पुरलं आता स्वप्नात छळतोय, त्याला बाहेर काढा अमितकडील 29 हजार 227 ई तिकिटांची विक्री झाली होती. त्यांची किंमत 7.97 कोटी रुपये आहे. आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार आरोपीला कसंबातून पकडण्यात आलं. त्याच्याकडं एमएससीआयची झाल्याचं प्रमाणपत्र आहे. अमितच्या हाताखाली तब्बल 500 एजंट काम करत होते. यासिवाय डॅनी शहाला अहमदाबादमधून ताब्यात घेतलं आहे. सूरतमधून पकडण्यात आलेल्या अमित प्रजापतीची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरु आहे. त्याचे कनेक्शन दहशतवादी संघटनांशी आहे का याचा तपास केला जात आहे. तो कोलकाता इथल्या जयंत पोद्दारशी थेट संपर्कात होता का याची माहिती घेण्यात येईल. वाचा : 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, सापडली 2 ओळींची सुसाईड नोट
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या