मराठी बातम्या /बातम्या /देश /भयंकर! नोकरी वाचविण्यासाठी वृद्ध दाम्पत्याला चिरडणाऱ्या दोन बहिणींनी रचला कट

भयंकर! नोकरी वाचविण्यासाठी वृद्ध दाम्पत्याला चिरडणाऱ्या दोन बहिणींनी रचला कट

Dwarka Car Accident twist: द्वारका येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघात प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आता अटकेत असलेल्या मुलीच्या लहान बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.

Dwarka Car Accident twist: द्वारका येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघात प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आता अटकेत असलेल्या मुलीच्या लहान बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.

Dwarka Car Accident twist: द्वारका येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघात प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आता अटकेत असलेल्या मुलीच्या लहान बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.

नवी दिल्ली, 8 एप्रिल: द्वारका (Dwarka)मध्ये चार दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याला चिरडल्याचा (Car ran over elderly couple) प्रकार समोर आला होता. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (accident caught in CCTV) झाला होता आणि या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी एका 30 वर्षीय मुलीला अटक केली होती. मात्र, आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला असून दिल्ली पोलिसांनी या मुलीच्या 28 वर्षीय बहिणीला अटक केली आहे. ही मुलगी एका आघाडीच्या बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करते.

रविवारी द्वारका येथे वृद्ध दाम्पत्याला चिरडण्यात आले होते. या अपघातात 79 वर्षीय शांती स्वरूप अरोरा आणि त्यांची पत्नी अंजना अरोरा (62) यांचा मृत्यू धाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दीपाक्षी चौधरी या 30 वर्षीय मुलीला अटक केली होती. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा यासाठी दीपाक्षीला पोलिसांनी अटक केली. शांती स्वरूप अरोरा हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी होते तर त्यांची पत्नी गृहिणी होत्या.

मात्र, पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना कार कोण चालवत होता याबाबत संशय होता. पोलीस तपासात असे समोर आले की, अपघातावेळी दीपाक्षी नाही तर तिची लहान बहीण नूपूर गाडी चालवत होती. त्यानंतर पोलिसांनी दोघींनाही अटक केली आहे.

पाहा: पोलिसांची गुंडगिरी! नाकाखाली मास्क घसरल्यानं रिक्षा चालकाला अमानुष मारहाण; पाहा VIDEO

अटकेच्या संदर्भात माहिती देताना पोलीस उपायुक्त (द्वारका) संतोषकुमार मीणा म्हणाले, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नूपूरकडे केवळ लर्निंग लायसन्स आहे आणि एफआयआरमध्ये नाव आल्यास नोकरी गमावण्याची तिला भीती होती.

पोलिसांनी सांगितले की, "दीपाक्षी चौधरी जखमींना उपचारासाठी मनिपाल रुग्णालयात घेऊन गेली. यावेळी तिने सांगितले की, ती गाडी चालवत होती आणि त्याच्या हातातूनच अपघात झाला. तपास अधिकाऱ्यांच्या समोर तिने कागदपत्रेही सादर केली. मात्र, पीडित कुटुंबाने संशय व्यक्त केला की, तिची बहीण गाडी चालवत होती."

पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात असे समोर आले की, ही घटना घडली तेव्हा नूपूर गाडी चालवत होती जी उत्तमनगर येथे एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, ती वाहन चालवत असताना आपलं व्हॉट्सअॅप चेक करत होती आणि त्याच दरम्यान तिने वृद्ध दाम्पत्याला चिरडले.

First published:
top videos

    Tags: Accident, Crime