मराठी बातम्या /बातम्या /देश /

जीवापेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे; अशा परिस्थितही कोरोना योद्धा ड्यूटीवर

जीवापेक्षाही कर्तव्य महत्त्वाचे; अशा परिस्थितही कोरोना योद्धा ड्यूटीवर

हाताची जखम अद्याप भरलेली नाही...मात्र हे योद्धा हॉटस्पॉट भागात ड्युटी करीत आहेत

हाताची जखम अद्याप भरलेली नाही...मात्र हे योद्धा हॉटस्पॉट भागात ड्युटी करीत आहेत

हाताची जखम अद्याप भरलेली नाही...मात्र हे योद्धा हॉटस्पॉट भागात ड्युटी करीत आहेत

    मेरठ, 14 मे : मेरठमधील एका भागात लोकांची तपासणी करणाऱ्यासाठी गेलेल्या टीमला वाईट वागणूक देण्यात आली होती. यावेळी पोलीस व प्रशासनाच्या टीमवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत मेरठचे सिटी मॅजिस्ट्रेट (City Magistrate)  सत्येंद्र कुमार सिंह जखमी झाले होते. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तातडीने ते पुन्हा ड्यूटीवर रुजू झाले होते. त्यांच्या हाताला अद्याप पट्टी बांधलेली आहे. त्यांच्या हाताची जखम अद्याप भरलेलीही नाही. मात्र तरीही हॉटस्पॉट भागात ते ड्यूटीवर तैनात आहे. देश कोरोनासारख्या (Coronavirus) जीवघेण्या संकटात असताना ड्यूटी महत्त्वाची असल्याचे ते म्हणतात. प्रयागराजमध्ये असलेल्या कुटुंबाशी व्हिडीओ कॉलवरच बोलतात मेरठचे सिटी मॅजिस्ट्रेट सत्येंद्र कुमार सिंह हे एक असं उदाहरण आहेत जे आपला जीव धोक्यात घालूनही आपले कर्तव्य पार पाडत आहेत. न्यूज 18 शी बोलताने ते म्हणाले,  माझं कुटुंब प्रयागराजमध्ये आले आणि मी इथे माझं कर्तव्य पार पाडत आहे. सत्येंद्र सिंह यांच्यासारखे अनेक कोरोना योद्धा कुटुंबापासून लांब राहून आपल्या ड्यूटीला प्राधान्य देत आहे. मेरठचे सीओ दिनेश शुक्लाही त्यापैकी एक आहेत. ते म्हणतात कर्तव्य कुटुंबापेक्षा मोठं आहे. या कोरोना योद्ध्यांना व्हिडीओ कॉलचा आधार असतो. आपल्या कुटुंबाची आठवण आली की ते त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर बोल तात. आपली मुलं आणि पत्नीची खुशाली घेतात. त्यांना पाहिल्यानंतर काम करण्याची अधिक ऊर्जा येते असे कोरोना योद्धा सांगतात. संबंधित -Lockdown : AMIMच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये कॉन्ट्रॅक्टवरून हाणामारी, दोन जखमी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो लॉकडाऊन
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या