Home /News /national /

लॉकडाऊनच्या संकटकाळात रेल्वे झाली मालामाल, केली 1 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई

लॉकडाऊनच्या संकटकाळात रेल्वे झाली मालामाल, केली 1 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई

रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020मध्ये 9896.86 कोटींची मालवाहतूक केली गेली. तर 2019मध्ये याच महिन्यात 8716.29 कोटींची मालवाहतूक झाली.

    नवी दिल्‍ली 01 ऑक्टोबर: कोरोना संकटाच्या (Coronavirus Crisis)  काळात अर्थव्यवस्था (Indian Economy)  तळाला गेली होती. सर्वच व्यवहार थंडावल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. मात्र या संकटाच्या काळातही काही दिलासा देणाऱ्या घटना घडल्या आहेत. रेल्वेची (Indian Railways)  प्रवासी वाहतूक लॉकडाऊनच्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण बंद होती. नंतर ती अगदीच कमी प्रमाणात सुरू झाली. मात्र या काळात मालवाहतुकीवर (Freight Income)  सकारात्मक परिणाम झाल्याची आकडेवारी समोर आली असून मागच्या वर्षीपेक्षा रेल्वेने 1 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2020मध्ये 9896.86 कोटींची मालवाहतूक केली गेली. तर 2019मध्ये याच महिन्यात 8716.29 कोटींची मालवाहतूक झाली. मागच्या वर्षीपेक्षी रेल्वेने 13.54 टक्के जास्त नफा मिळवला. लॉकडाऊन असल्यामुळे प्रवासी वाहतूक बंद होती त्यामुळे मालगाड्यांना मोकळा मार्ग मिळाला. त्याकाळात या गाड्यांचा वेगही जास्त होता. त्यामुळे जास्त फेऱ्या करता आल्या. यातून ही मोठी कमाई झाली आहे. खासगी रुग्णालयाचा प्रताप; अवघ्या 7 हजार रुपयांसाठी नवजात बाळाचा केला व्यवहार दरम्यान,  कोरोनामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी सर्व ट्रेन, विमान वाहतुक बंद करण्यात आली. दरम्यान या कालावधीत काहींनी एअरलाइन्सचे तिकीट बुक केले होते. त्यांच्यासाठी आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानं डीजीसीएद्वारा क्रेडिट शेलच्या माध्यमातून लॉकडाऊन कालावधीत एअरलाइन्सचे तिकीट काढलेल्या सर्व प्रवाशांना पैसे परत देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. बिहारमध्ये खळबळ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर 25 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यावेळी बाहेरच्या देशातून भारतात परतलेल्या लोकांमुळे कोरोनाचे संक्रमण अधिक होत्याचे लक्षात येताच क्रेंद्र सरकारनं सर्व विमान उड्डाणे बंद केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्यामुळे याचा फटका ग्राहकांना आणि एअरलाइन्स कंपन्यांना बसला. मात्र आता लॉकडाऊन कालावधीत एअरलाइन्सचे तिकीट काढलेल्या रिफंड देण्याच्या प्रस्तावावर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Indian railway

    पुढील बातम्या