नाईट कर्फ्यूदरम्यान पोलिसांचं कडक चेकिंग, ठिकठिकाणी गाड्या थांबवल्या; पाहा VIDEO

नाईट कर्फ्यूदरम्यान पोलिसांचं कडक चेकिंग, ठिकठिकाणी गाड्या थांबवल्या; पाहा VIDEO

20 नोव्हेंबरपासून रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. प्रशासनाकडून 57 तासांच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे.

  • Share this:

गांधीनगर, 21 नोव्हेंबर : अहमदाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या (Covid-19 Ahmedabad) वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने कर्फ्यू जाहीर केला आहे. 20 नोव्हेंबरपासून रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू (Curfew) असणार आहे. प्रशासनाकडून 57 तासांच्या कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे (coronavirus) गुजरात सरकार (Gujarat Government) अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. अहमदाबादसह राजकोट, सूरत आणि वडोदरामध्येही कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट कर्फ्यूदरम्यान, ठिकठिकाणी पोलिसांकडून वाहनांचं चेकिंग करण्यात येत आहे. पुढील आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे.

दुसरीकडे, रेल्वेने अहमदाबाद पोहचलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु अहमदाबादमार्गे इतर शहरात जाणारे प्रवासी अडकले आहेत. मोठ्या गर्दीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, हा निर्णय सध्या रद्द करण्यात आला आहे. सरकारने अद्याप शाळा-कॉलेज सुरू करण्याबाबत कोणत्याही नव्या तारखांची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 57 तासांचा कर्फ्यू असणार आहे. यादरम्यान केवळ दूध आणि औषधांची दुकानं सुरू राहणार असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 21, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या