लॉकडाऊनमध्ये मनोरुग्णांचे हाल; औषधांअभावी हातपाय बांधण्याची नामुष्की

लॉकडाऊनमध्ये मनोरुग्णांचे हाल; औषधांअभावी हातपाय बांधण्याची नामुष्की

मनोरुग्णांचे (mentally illpatients) हातपाय बांधून त्यांना आवरण्याची वेळ आता त्यांच्या कुटुंबावर ओढावली आहे.

  • Share this:

प्रभंजन कुमार/रांची, 29 जून : लॉकडाऊन (lockdown) अनेकांना मानसिक समस्या (mental problem) उद्भवत आहेत. मात्र ज्यांना आधीपासूनच मानसिक आजार (mental disease) आहे, अशा मनोरुग्णांची (mentally ill patient)दे परिस्थिती तर अधिकच गंभीर झाली आहे. लॉकडाऊनमध्ये औषध मिळत नसल्याने या मनोरुग्णांचे हातपाय बांधून त्यांना आवरण्याची वेळ आता त्यांच्या कुटुंबावर ओढावली आहे.

झारखंडमधील धालभूमगढच्या पावडा नरसिंहगढ आणि कोकपाडा नरसिंहगढमध्ये जवळपास 10 ते 15 मनोरुग्ण आहेत. या सर्व रुग्णांना दर महिन्याला औषध दिलं जातं, तेव्हा कुठे ते ठिक राहतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्यांना औषध मिळालं नाही, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली.  लॉकडाऊनमध्ये औषध मिळत नसल्याने या रुग्णांची परिस्थिती अधिक बिघडत चालली आहे. काही कुटुंबाने तर आपल्या रुग्णाचे हातपाय बांधून ठेवले आहेत.

हे वाचा - 24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; 2 जणांचा मृत्यू

पावडा नरसिंहगढची बेला कालंदी हिनं सांगितलं की, तिचा मुलगा किशन मानसिक रुग्ण आहे. समाजसेवक संगीता अग्रवाल यांच्या माध्यमातून त्यांना दर महिन्याला औषध मिळायचं. त्यांच्या मृत्यूनंतर घाटशिलातील रामकृष्ण मिशन मठात मोफत औषध मिळतं. रामकृष्ण मिशन मठात जमशेदपूरहून डॉक्टर यायचे आणि तिथंच सर्व मनोरुग्णांना औषध दिलं जायचं. मात्र लॉकडाऊनदरम्यान डॉक्टरही आले नाहीत आणि औषधांची व्यवस्थाही करण्यात आली नाही.

जमशेदपूरला रुग्णालयात जाऊन औषध आणावं लागेल. लॉकडाऊनमुळे ते जमशेदपूरला जाऊ शकत नाहीत. खासगी रुग्णालयातून औषध घेतलं तर कमीत कमी एक हजार रुपये लागतात. गरीब असल्याने त्यांना ते परवडणारं नाही.

हे वाचा - कोरोनाशी लढा - जगातील सर्वात मोठं Plasma Therapy Trial महाराष्ट्रात होणार

त्यामुळे किशनला त्याच्या कुटुंबाने आता बांधून ठेवलं आहे. अशीच परिस्थिती सरोज नामाता रोबिन नंदा यांच्यासह इतर मनोरुग्णांचीही आहे. आपला रुग्ण अशा परिस्थिती काही करणार तर नाही ना, कुठे दूर तर पळून जाणार नाही ना, अशी चिंता या कुटुंबाला आता भेडसावू लागली आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 29, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या