लखनऊ, 26 जानेवारी : मंडप सजला होता, वरात दारी आली होती. सनई-चौघडा वाजत होता. लग्नाच्या काही विधीही झाल्या होत्या. वर-वधू एकमेकांना वरमाला घालणार होत्या. त्यांच्या डोईवर अक्षता पडणार होत्याच. अखेर ती लग्नघटिका समीप आली तोच लग्नाचं संपूर्ण चित्रच बदललं. नवरीबाईने असा काही निर्णय घेतला की सर्वांनाच धक्का बसला.
लग्न झाल्यानंतर लग्न मोडल्याची प्रकरणं तुम्ही बरीच पाहिली असतील. पण सध्या असं प्रकरण चर्चेत आलं आहे, जे लग्नाच्या दिवशी होण्याआधीच मोडलं आहे. नवरदेवाने भरमंडपात असं काही केलं की नवरीबाईनेही लग्नाला नकार दिला
(During jaymaal bride deny to marry with groom). तिला सर्वांनी मनवलं पण ती लग्नाला तयारच झाली नाही.
उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. इथं राहणाऱ्या रोशनीचं लग्न कन्नौज जिल्ह्यातील बहबलपूरमधील आकाशसमोबत ठरलं. दोघांच्याही लग्नाचा दिवस होता. लग्नाच्या काही विधी पारही पडल्या होत्या. पण लग्नातच नवरदेवाने असं काही केलं की नवरीबाईही संतप्त झाली.
हे वाचा - VIDEO- पुनर्जन्माची रिअल स्टोरी! चिमुकलीने जे सांगितलं ते खरं निघालं; सर्व हैराण
झालं असं की वरमाला घालताना नवरदेव काही कारणामुळे संतप्त झाला. त्याने आपल्या हातातील वरमाला फेकली. डोक्यावरील फेटाही काढून त्याने फेकून दिला. नवरदेव शेर तर नवरी सव्वाशेर. तिनेही त्याला जशास तसं उत्तर दिलं. हट्टी नवरदेवाचा तिने लग्नातच माज उतरवला. नवरदेवाने वरमाला, फेटा फेकताच तिने थेट लग्नालाच नकार दिला आणि एकच खळबळ उडाली.
नवरीबाईच्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला. तिचं कुटुंब, नातेवाईक आणि लग्नात मध्यस्थी करणारे सर्वजण तिला मनवू लागले. पण नवरीबाईने कुणाचंच ऐकलं नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. नवरा मुलगा विचित्र वागतो त्यामुळे आपल्याला लग्न करायचं नाही , असं तिने स्पष्टपणे सांगितलं.
हे वाचा - बेस्ट फ्रेंडलाच लग्नात No entry; नवरीबाईने ठेवली विचित्र अट कारण...
याबाबत नवरदेवाला विचारलं असता, त्याने नवरीने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळले. त्याने सांगितलं की, जेव्हा तो जेवायला गेला तेव्हा त्याने आहेर मागितला होता. जो त्याला देण्यात आला नाही. त्यामुळे त्याने जेवायला नकार दिला. त्याने वरमाला फेकली नव्हती. त्याच्या बहिणीचा नवरा आणि भाचही त्यावेळी सोबत होता. याच कारणामुळे नवरीबाईने लग्नाला नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.