राजस्थान, 11 जानेवारी : जैसलमेरमध्ये एका महिलेच्या प्रसुतीदरम्यान डाॅक्टरांच्या हलगर्जीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय आरोग्य केंद्रातील (CHC) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही डाॅक्टरांवर आरोप आहे की, 'त्यांनी प्रसुतीदरम्यान नवजात बाळाला जोरात ओढले, त्यामुळे बाळ दोन भागात विभागले गेले.'
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मृत नवजात बाळाचे वडील त्रिलोक सिंह यांनी सांगितलं की, 'मी माझ्या पत्नीला प्रसुतीसाठी 6 जानेवारील रामगड येथील शासकीय आरोग्य केंद्रात घेऊन गेलो होतो. परंतु, तिथे डॉक्टर हजर नव्हते. प्रसुतीसाठी तेथील कंपाऊंडरने दुसऱ्या व्यक्तीला बोलावले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, प्रसुती करण्यात अडचणी येत असून मुलाला जिंवत वाचवता येणार नाही.'
त्यानंतर त्यांनी जैसलमेर इथं दाखल होण्यास सांगितलं, तिथे गेल्यावर आम्हाला जोधपूरला पाठवण्यात आलं होतं. जोधपूर इथं पोहोचल्यावर डाॅक्टरांनी सांगितलं की, 'बाळाचे दोन तुकड्यात विभाजन झाले आहे. त्याचे मुंडके फक्त पोटात आहे, उर्वरीत शरीर आधीच काढून घेतले आहे.'
डाॅक्टरांनी माहिती दिल्यानंतर सिंह दाम्पत्याला एकच धक्का बसला. आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या बाळ मृत झाले आहे, असे माहिती असून सुद्धा त्यांनी सिंह दाम्पत्यापासून ही बाब लपवून ठेवली. अखेर त्रिलोक सिंह पोलिसांत धाव घेतली.
आरोग्य केंद्रात काम करणारा कर्मचारी जुझार सिंह आणि अमृत लालविरोधात आयपीसी कलम 304 ए आणि 336 नुसार मंगलवार रात्री गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मृत बाळाचे शरीर ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
=============