मराठी बातम्या /बातम्या /देश /

भिलाई स्टील प्लांटमध्ये गॅस लीक, 6 कर्मचारी जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

भिलाई स्टील प्लांटमध्ये गॅस लीक, 6 कर्मचारी जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

नेमकी घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू आहे.

नेमकी घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू आहे.

नेमकी घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मिथिलेश ठाकूर,(प्रतिनिधी)

दूर्ग,3 जानेवारी: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दूर्ग (Durg) जिल्ह्यात भिलाई स्टील प्लांटमध्ये (Bhilai Steel Plant) गॅस लीक (Gas Leakage) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर भिलाई सेक्टर-9 येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री उशीरा ब्लास्ट फर्नेस नंबर 8 मध्ये गॅस लीक झाला. या घटनेत सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सेक्टर-9 हॉस्पिटलमध्ये त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. जखमींमध्ये लोको चालक अभिषेक आनंद, सिग्नलमन बालकृष्ण, लोको चालक के.नागराज, संतोष कुमार, कालीदास, आणि डीजीएम राजेश कुमार यांचा समावेश आहे. नेमकी घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू आहे.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना..

दरम्यान, यापूर्वीही भिलाई प्लांटमध्ये अशी घटना घडली होती. या आधी 9 ऑक्टोबर, 2018 रोजी अपघात झाला होता. स्टील प्लांटच्या कोक ओव्हनच्या बॅटरी क्रमांक 11 च्या गॅस पाइपलाइनमध्ये ब्लास्ट झाला होता. या अपघातात 14 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने भिलाई स्टील प्लांटच्या व्यवस्थापनाला चौकशी अहवाल मागितला होता. याशिवाय कामगार मंत्रालयानेही चौकशी अहवाल मागितला होता. या अपघाताच्या आधीही प्लांटच्या स्टील मेल्टिंग शॉप (SMS) 1 मध्ये सलग तीन स्फोट झाले होते. त्यात सात जण होरपळले होते.

First published: