मराठी बातम्या /बातम्या /देश /फटाके बंदीच्या नियमांना दिल्लीकरांनी दाखवली केराची टोपली; हवा प्रदूषणानं गाठली सर्वोच्च पातळी

फटाके बंदीच्या नियमांना दिल्लीकरांनी दाखवली केराची टोपली; हवा प्रदूषणानं गाठली सर्वोच्च पातळी

मध्यरात्रीपर्यंत जवळपास दिल्लीतील प्रत्येक भागात हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी ओलांडली होती. दिल्लीतील अनेक भागांसह उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्ये 999 एक्युआयची नोंद झाली.

मध्यरात्रीपर्यंत जवळपास दिल्लीतील प्रत्येक भागात हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी ओलांडली होती. दिल्लीतील अनेक भागांसह उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्ये 999 एक्युआयची नोंद झाली.

मध्यरात्रीपर्यंत जवळपास दिल्लीतील प्रत्येक भागात हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी ओलांडली होती. दिल्लीतील अनेक भागांसह उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्ये 999 एक्युआयची नोंद झाली.

    नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं हवा प्रदूषणाच्या (Air pollution) समस्येचा सामना करत आहे. दरवर्षी दिल्लीतून मान्सून गेल्यानंतर लगेचच हवा प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ होते. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या (Firecrackers) आतषबाजीमुळे आणि थंडीच्या धुक्यामुळे तर श्वास घेणंदेखील कठीण होऊन जातं. या वर्षीसुद्धा दिवाळीपूर्वी (Diwali) दिल्लीच्या हवा प्रदूषण पातळीमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली. येथील एअर क्वालिटी इंडेक्सच्या (AQI) अत्यंत खालावलेल्या पातळीमुळे सरकारनं ग्रीन फटाक्यांची (Green Firecrackers) विक्री करण्यास आणि उडवण्यासदेखील परवानगी नाकारली होती.

    दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील काही जिल्ह्यांमध्येही फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असं असतानाही दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi NCR) नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आतषबाजी केल्याचं दिसून आलं आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    Diwali Celebrations 2021: पाहा, जगभरातील दिवाळी सेलिब्रेशनचे PHOTOs

    दिल्ली आणि आसपासच्या परिसरात फटाक्यांवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. परिणामी लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता खूपच खराब झाली. मध्यरात्रीपर्यंत जवळपास दिल्लीतील प्रत्येक भागात हवेच्या गुणवत्तेनं धोक्याची पातळी ओलांडली होती. दिल्लीतील अनेक भागांसह उत्तर प्रदेशातील नोएडा आणि गाझियाबादमध्ये 999 एक्युआयची नोंद झाली. आज (5 नोव्हेंबर 2021) सकाळच्या वेळीसुद्धा एक्युआय पातळी 999 वर स्थिर होती. 999 एक्यूआयही सर्वात उच्चांकी संख्या असते. म्हणजेच दिल्लीतील हवा प्रदूषणानं लक्ष्मीपूजनाच्या रात्रीपासून पाडव्याच्या पहाटेपर्यंत सर्वोच्च पातळी गाठली होती.

    दिल्ली आणि एनसीआरमधील बहुतांशी ठिकाणी एक्युआय 999 पर्यंत गेला आहे. दिल्लीतील इंडिया गेट, जवाहर लाल नेहरू स्टेडियम, श्रीनिवास पुरी पर आणि नोएडा व गाझियाबादमधील सर्व एक्यूआय चेकिंग स्टेशनवरील एक्यूआय स्तर 999 वर गेला आहे. जवाहरलाल नेहरु स्टेडियम परिसरात पहाटे 6 वाजता पीएम 2.5 चं प्रमाण 1164 मायक्रोग्रॅम प्रति मीटर क्युब नोंदवलं गेलं जे सामान्य परिस्थितीत 60 मायक्रोग्रॅम प्रति मीटर क्युब इतकं असायला हवं. नेहरू स्टेडियमवरचं पीएम 2.5 चं प्रमाण सामान्य प्रमाणाच्या 20 पटीने अधिक होतं.

    कमालीचा योगायोग! दिवाळीच्या रात्री होणार ‘दैवी’ आतषबाजी

    400 ते 500 एक्यूआयपर्यंत गेलेली हवा प्रदूषणाची पातळी गंभीर मानली जाते. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये तर सकाळी 999 एक्यूआय नोंदवला गेला. हा आकडा गंभीर पातळीच्याही दुप्पट आहे. म्हणजेचं दिल्लीतील हवा प्रदूषणानं सर्वोच्च पातळी गाठली आहे, हे यावरून स्पष्ट होते.

    हवा प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. मात्र, नागरिकांनी सरकारी आदेश पायदळी तुटवून फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद घेतला. येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील यात शंका नाही.

    First published:
    top videos

      Tags: Air pollution, Delhi News