मराठी बातम्या /बातम्या /देश /

माकडाच्या भीतीने घेतला जीव; 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

माकडाच्या भीतीने घेतला जीव; 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

माकडापासून जीव वाचवता वाचवता मुलाने जीव गमावला.

माकडापासून जीव वाचवता वाचवता मुलाने जीव गमावला.

माकडापासून जीव वाचवता वाचवता मुलाने जीव गमावला.

    रोहतक, 07 ऑक्टोबर : आपल्या प्रत्येकाला कशाची ना कशी भीती वाटते. काही जणांच्या बाबतीत ही भीती इतकी गंभीर होते की ही भीतीच जीवघेणी ठरते. अशीच धक्कादायक घटना घडली ती हरयाणामध्ये (Haryana). माकडांच्या भीतीने एका मुलाने आपला जीव गमावला आहे (Boy died fear of monkey). जींदच्या नरवानामधील ही धक्कादायक घटना आहे. 14 वर्षांचा शुभम आपल्या मित्रांसोबत सकाळीच फिरायला गेला होता. ज्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे (Boy died in canal). पोलिसांना कालव्यात त्याचा मृतदेह सापडला आहे. शुभमने माकडांच्या भीतीने पाण्यात उडी मारल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे. शुभमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरसा ब्रांच कालव्याजवळ ते फिरत होते. तेव्हा त्यांच्यामागे काही माकडं लागली. यानंतर भीतीने शुभमचे मित्र शताकडे पळत गेले तर शुभमने कालव्यात उडी मारली. बराच वेळ शुभम कालव्यातून बाहेर आला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबाला घटनेबाबत माहिती दिली. हे वाचा - बापरे! हे काय? चिमुकल्या लेकाच्या हाती लागलं असं खेळणं; पाहून वडिलही हादरले शुभमचं कुटुंबं पोलिसांना घेऊन कालव्याजवळ पोहोचलं. पोलिसांना कालव्यात शुभमचा मृतदेह सापडला. शुभमचा कालव्यात बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार शुभम नववीत होता. दररोज सकाळी तो मित्रांसोबत नवदीप स्टेडिअममध्ये धावण्यासाठी जायचा. गुरुवाची सुट्टी होती. म्हणून तो मित्रांसोबत कालव्याजवळ गेला. हा कालवा त्याच्या घरापासून तीन किलोमीटर दूर आहे. हे वाचा - शिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute प्रत्येकाला आपलं आयुष्य प्रिय असतं. त्यामुळे आपल्या जीवावर संकट येताच त्या संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न आपण करतो. पण काही वेळा जीव वाचवण्याच्या नादातच आपण जीव गमावून बसतो. असाच जीव वाचवता वाचवता या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Death, Haryana, Water

    पुढील बातम्या