Elec-widget

'गगनयान'साठी 60 पैकी 12 जण शॉर्टलिस्ट; अनेकांना दाताने दिला धोका!

'गगनयान'साठी 60 पैकी 12 जण शॉर्टलिस्ट; अनेकांना दाताने दिला धोका!

केवळ दात मजबूत नसल्यामुळे अंतराळ मोहिमेवर जाण्याचे अनेकांचे स्वप्न भंगल्याचा समोर आले आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 16 नोव्हेंबर: अंतराळ मोहिमेवर जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अंतराळात जाण्यासाठी अनेक कसोटी पार कराव्या लागतात. शारिरिक आणि मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे असते. शारीरिक आरोग्यामध्ये दात मजबूत असे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. होय केवळ दात मजबूत नसल्यामुळे अंतराळ मोहिमेवर जाण्याचे अनेकांचे स्वप्न भंगल्याचा समोर आले आहे. भारताच्या पहिल्या मानवरहित अंतराळ मोहिमेसाठी अनेकांची दात मजबूत नसल्यामुळे निवड होऊ शकली नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (isro)च्या पहिल्या गगनयान (Gaganyaan)मोहीमेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. या मोहीमेसाठी अंतराळवीरां(Astronauts)ची निवड प्रक्रिया सुरु आहे. इस्टीट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (Institute of Aerospace Medicine)मध्ये गेल्या 3 महिन्यांपासून भारतीय हवाई दला(Air Force)तील वैमानिकांची चाचणी घेतली जात आहे. या निवड प्रक्रियेतून केवळ 12 जणांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.

रशियाच्या मदतीने स्टार सिटी येथे युरी गागरीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये गेल्या 45 दिवसांपासून 60 विविध क्षेत्रातील वैमानिकांचे प्रशिक्षण घेम्यात आले. यातील 12 जणांची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणानंतर संबंधित वैमानिक आता पुन्हा भारतात परत येणार आहेत. या प्रशिक्षण झालेल्या वैमानिकांपैकी काहींना 2022 मध्ये गगनयान मोहीमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. यासंदर्भात इंडियन सोसायटी ऑफ एअरोस्पेस मेडिसिनच्या वार्षिक बैठकीत ही माहिती समोर आली की, अनेकांची दाता संदर्भातील समस्येमुळे निवड झाली नाही.

1984मध्ये रशियाच्या सोयुझ टी-11 मोहीमेसाठी राकेश शर्मा आणि रवीश मल्होत्रा यांची निवड झाली होती. या घटनेनंतर 3 दशकानंतर पुन्हा एकदा अंतराळ मोहीमेसाठी उमेदवारांची निवड केली जात आहे. हवाई दलाकडून 24 वैमानिकांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 16 जाणांची निवड झाली होती. पण रशियाच्या टीमने केलेल्या टेस्टनंतर अनेकांना दाताची समस्या असल्याने त्यांना अनफिट घोषित करण्यात आले. अंतराळ मोहीमेत दाता संदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच अनेकांची निवड होऊ शकली नाही.

गगनयान मोहीमेचे एकूण बजेट 10 हजार कोटी इतकी आहे. यात मोहीमेसाठी हार्डवेअर आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. गेल्या 4 दशकात भारत-रशिया यांच्यात अंतराळ संशोधन सहकार्य आहे. 2015मध्ये दोन्ही देशांनी भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्टच्या प्रक्षेपणाचा 40वी वर्षपूर्ती साजरी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...