...मोडला नाही कणा! 120 किलोमीटरचा सायकल प्रवास करून विकतोय मिठाई, 19 वर्षीय तरुणाचा संघर्ष

...मोडला नाही कणा! 120 किलोमीटरचा सायकल प्रवास करून विकतोय मिठाई, 19 वर्षीय तरुणाचा संघर्ष

कोरोनामुळे मोठमोठ्या अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलं आहे, तर स्थानिक विक्रेते-व्यापारी यांना देखील नुकसान सहन करावं लागत आहे. मात्र अनेकांनी जगण्यासाठी कोरोनाविरोधात सुरू असलेला हा संघर्ष सुरूच ठेवला आहे.

  • Share this:

कोलकाता, 04 नोव्हेंबर: पश्चिम बंगालमधील 19 वर्षीय इम्रान शेख हा मुलगा मिठाई विकण्यासाठी नादिया जिल्ह्यातून राजधानी कोलकात्यामध्ये सायकलवरून 120 किलोमीटरचा प्रवास करावा लागत  आहे. कोरोनाच्या संकटामुळे (Coronavirus Pandemic) लोकल ट्रेन बंद असल्यामुळे तो मिठाई विकण्यासाठी सायकलवरून दररोज 120 किलोमीटरचा प्रवास करत आहे. इम्रान दररोज सात ते आठ तासाचा प्रवास करून मिठाई विकण्यासाठी कोलकात्यामध्ये येतो. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.

नादिया जिल्हा हा पश्चिम बंगालमध्ये मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मिळणारी सरपुरिया ही मिठाई खास प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या संकटानंतर सरकारने अनलॉक-1 (Unlock 1) सुरू केले. त्यानंतर इम्रानने घरी न बसता सायकलवरून मिठाई विकण्याचा निर्णय घेतला. त्याने कोलकात्यातील काही दुकानदारांशी संपर्क केला असून त्याच्या मिठाईची किंमत अवघी 5 रुपये आहे. मार्केटच्या किमतीच्या तुलनेत ती खूपच स्वस्त असल्याने त्याला मागणी देखील खूप आहे. यासाठी तो पहाटे 3 वाजता सायकलवरून निघतो. कोलकात्याला येत असताना रस्त्यात असणाऱ्या गावांमध्ये देखील तो मिठाई विकतो. त्यानंतर सकाळी 7 वाजता तो कोलकात्यात पोहोचतो आणि तिथे मिठाई विकायला सुरुवात करतो.

(हे वाचा-पत्नीला दरमहा पैसे ट्रान्सफर करत असाल तर तिलाही येणार Income Tax नोटीस?)

इम्रानने दिलेल्या माहितीनुसार, आधी आधी त्याच्याकडील एकूण 300 पदार्थांची विक्री होत असे,परंतु आता मागणी वाढली असून दिवसभरात 700 पदार्थांची विक्री होते. त्यामुळे त्याने मेहनत आणि जिद्दीने सुरू केलेल्या व्यवसायाने जोर पकडला आहे. इम्रान रसगुल्ला, गुलाबजाम आणि लांगचा या प्रकारच्या मिठाईची विक्री करतो. त्याचबरोबर कोरडी मिठाईही देखील विकतो. त्याचे आई वडील हे शेती करत असून तो मिठाई विक्री करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतो. सागर या टोपण नावाने इम्रान त्या भागात प्रसिद्ध आहे. त्याला हा व्यवसाय आवडत असल्याने कोरोनाच्या या संकटानंतरही त्याने तो सुरु ठेवल्याचे इम्रान सांगतो.

(हे वाचा-पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन)

दरम्यान, भारतात 25 मार्च 2020 ला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद करण्यात आली होती आणि अजूनदेखील नागरिकांना कामासाठी त्यांच्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 4, 2020, 3:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या