अरेरे... सहावी पत्नी 271 कोटींसह गायब!

अरेरे... सहावी पत्नी 271 कोटींसह गायब!

एका देशाच्या राणीनं पैसे घेऊन पळ काढल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी.

  • Share this:

दुबई, 30 जून :  इथं चक्क एका देशाच्या पंतप्रधानाची पत्नी 271 कोटी रूपये घेऊन फरार झाली आहे. विश्वास नाही ना बसत? दुबईतील अरबपती असलेले आणि संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या सहाव्या पत्नीनं दुबईतून आपल्या दोन मुलांना घेऊन पळ काढला आहे. यावेळी राणी हया हिनं तब्बल 271 कोटी रूपये घेतले आहेत. राणी हयानं लंडनमध्ये आश्रय घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण, आता मात्र वेगळीच माहिती समोर येत आहे.

कोण आहे राणी हया आणि का पळाली?

राणी हया संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी पत्नी आहे. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. जलिया ( 11 वर्षे ) आणि जायद ( 7 वर्षे ) अशी य दोघांची नावं आहेत. जॉर्डनचे राजा अब्दुलाह यांची राणी हया ही सावत्र बहिण आहे. मागील काही दिवसांपासून पती – पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे राणी हयानं जर्मनीमध्ये आश्रय घेतला असावा अशी माहिती समोर येत आहे. दुबईतून निघताना राणी हयानं आपल्याला लागणारे पैसे देखील सोबत घेतले आहेत. राणी हया पाश्चिमात्य देशांमध्ये परिचित आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतल्यानंतर राणी हयानं सामाजिक कार्यात झोकून दिलं होतं.

मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राणी हयाला कुणी केली मदत?

राणी हयाला दुबईतून बाहेर पडण्यासाठी जर्मन दुतावासानं मदत केली असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राणी हया पैसे आणि दोन मुलांना घेऊन जाणं अशक्य आहे. पूर्वीपासूनच राणी हया आणि जर्मन दूतावासाचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे जर्मनी राणीला दुबईमधून बाहेर पडण्याकरता मदत करू शकते. पण, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध देखील ताणले गेले आहेत.

काय सांगताsss चालकाने छत्री धरून चालवली केडीएमसीची गळकी बस

जर्मनीचा मात्र नकार

शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी जर्मनीला फोन करून पत्नीला परत देण्यास सांगितले आहे. पण, जर्मनीनं मात्र या प्रकरणात कोणतीही मदत करण्यास नकार दिला आहे.

मुलीनं देखील केला होला पळण्याचा प्रयत्न

यापूर्वी शेख मुहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या मुलीनं देखील पळण्याचा प्रयत्न केला होता. लतीफा असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. पण, तेव्हा लतीफाला भारतीय तटरक्षक दलानं गोवा इथं पकडलं होतं. त्यानंतर लतीफाला पुन्हा दुबईच्या हवाली करण्यात आलं होतं.

SPECIAL REPORT: गळक्या शाळेत विद्यार्थ्यांची शिकण्यासाठी कसरत

First published: June 30, 2019, 10:07 AM IST
Tags: dubai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading