Facebookवर ‘भीक’ मागून महिलेनं 17 दिवसात कमावले 35 लाख!

फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर करत महिलेनं 17 दिवसांमध्ये तब्बल 35 लाख रूपये गोळा केले.

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 01:16 PM IST

Facebookवर ‘भीक’ मागून महिलेनं 17 दिवसात कमावले 35 लाख!

दुबई, 11 जून : फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर भीक मागण्यासाठी करत दुबईतील महिलेनं 17 दिवसांमध्ये तब्बल 35 लाखांची कमाई केली. तुम्हाला विश्वास नाही ना बसत? पण, अरब अमिरातच्या एका महिलेनं दुबईमध्ये ऑनलाईन भीक मागून 17 दिवसांमध्ये तब्बल 35 लाख रूपये जमा केले आहेत. पण, महिलेच्या नवऱ्यानं तिचं पितळ उघडं पाडलं. त्यानंतर या महिलेची रवानगी ही जेलमध्ये करण्यात आली आहे. 'खलिजा टाईम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कसे कमावले पैसे

सदर महिलेनं फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडलं. त्यानंतर घरात अन्याय, अत्याचार होत असल्याचं म्हणत मुलांच्या पालनपोषणासाठी मदतीची याचना केली. शिवाय, मुलांचे फोटो आणि भावनिक पोस्ट फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करत लोकांना मदतीचं आवाहन केलं. सारी परिस्थिती समजल्यामुळे लोकांनी देखील ऑनलाईन पैसे पाठवले. पण, महिलेच्या आधीच्या पतीनं ई – क्राईम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार केली. तसंच मुलं त्याच्यासोबत राहत असल्याचं नवऱ्यानं सिद्ध केलं.


महाराष्ट्र, गुजरातला ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका; हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी

Loading...

कुठून आली idea

महिलेला क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ही आयडीया आली. परदेशामध्ये ऑनलाईन दान देण्याचं प्रमाण जास्त आहे. याच गोष्टीचा पुरेपूर फायदा हा महिलेनं उचलत 17 दिवसांमध्ये तब्बल 35 लाख रूपये गोळा केले.


भर रस्त्यात जावयावर सपासप वार, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...