मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या DSP दविंदरचं IBला मिळालं खळबळजनक पत्र

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या DSP दविंदरचं IBला मिळालं खळबळजनक पत्र

' त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं.'

' त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं.'

' त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं.'

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 18 जानेवारी : दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली जम्मू काश्मीरचे पोलीस अधिकारी DSP दविंदर अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या विरुद्ध आता IB चौकशी करत आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. यात आयबीच्या हातात एक खळबळजन पत्र लागलं असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. काही दहशतवाद्यांसोबत दविंदरला अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून तो दहशतवाद्यांना सामील असल्याचं उघड झालं होतं. IBला मिळालेल्या माहितीनुसार, 2005मध्ये दिल्ली पोलिसांनी सात अतिरेक्यांना अटक केली होती. या अतिरेक्यांकडून AK-47 आणि मोठ्या प्रमाणावर नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर IBला एक चिठ्ठीही मिळाली होती. दविंदर यांनी ती चिठ्ठी लिहिली होती. हे सर्व अतिरेकी हे हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधीत असल्याचं म्हटलं जात होतं. या अतिरेक्यांमध्ये हाजी गुलाम मोइनुद्दीन डार उर्फ जाहिद हा एक अतिरेकी होता. त्याच्याकडे दविंदर याचं एक पत्र मिळालं होतं. हे पत्र त्याने त्याच्या लेटहेडवर लिहिलेलं होतं. हाजी गुलाम हा पुलवामा इथला रहिवाश आहे. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि वायरलेस सेट आहे. त्याला कुठल्याही चौकशीशिवाय जावू द्या, थांबवू नका असं त्या पत्रात म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले... हे पत्र त्याने कुठल्या उद्देशाने दिलं होतं हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यावेळी त्याची माहितीही बाहेर आली होती. मात्र त्याला गांभीर्याने घेतलं गेलं नाही त्यामुळेच त्याची हिंम्मत वाढली असं सांगितलं जातंय.

शिर्डी विरुद्ध पाथरी, साईबाबांच्या जन्मस्थळावरून का होतोय वाद?

हिजबुलच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या पोलिस अधिकारी दविंदर सिंगबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवादी आणि सिंग यांच्यात 12 लाख रुपयांचे डील झाल्याचे सांगण्यात य़ेत आहे. काश्मीरमधील कुलगाम इथं अटक केल्यानंतर डीएसपी सिंगची चौकशी सुरू आहे. 12 लाख रुपयांच्या बदल्यात दविंदर सिंग दहशतवाद्यांना सुरक्षित चंदीगढला पोहचवणार होता. त्यासाठी त्याने चार दिवसांची सुट्टी घेतली होती असे वृत्त दैनिक जागरणने दिलं होतं.
First published:

Tags: Jammu and kashmir

पुढील बातम्या