अपघाताची विम्याऐवजी ड्रायव्हरकडून भरपाई, लोकसभेत विधेयक सादर

दारू पिऊन गाडी चालवली आणि त्यातून अपघात झाला तर पीडित व्यक्तीच्या उपचाराचा सगळा खर्च तसंच नुकसान भरपाई आता ड्रायव्हरकडूनच वसूल केली जाणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2017 12:22 PM IST

अपघाताची विम्याऐवजी ड्रायव्हरकडून भरपाई, लोकसभेत विधेयक सादर

08 एप्रिल : दारू पिऊन गाडी चालवली आणि त्यातून अपघात झाला तर पीडित व्यक्तीच्या उपचाराचा सगळा खर्च तसंच नुकसान भरपाई आता ड्रायव्हरकडूनच वसूल केली जाणार आहे. लोकसभेत काल मोटार वाहन सुधारीत विधेयक सादर करण्यात आलंय. त्यात ही तरतूद केली गेलीय.

विशेष म्हणजे या विधेयकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. तसं झालं तर अपघात करणाऱ्या आरोपीला 10 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. तशी सूचना संसदीय समितीनं केलेली आहे. अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठीच नशेखोर ड्रायव्हरकडूनच नुकसान भरपाई घेण्याची तरतुद केली गेल्याचं वाहतूक मंत्रालयाचं म्हणणं आहे.

पण त्यावर जाणकारांनी नाराजी व्यक्त केलीय. कारण नुकसानीचा विमा मिळाला तर रक्कम जास्त मिळाली असती. आता तसं न केल्यामुळे पीडितांना नुकसान भरपाईचा तोटा होईल. कारण सगळेच ड्रायव्हर काही श्रीमंत नसतात आणि ना त्यांची नुकसान भरपाईची ऐपत असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...