S M L

रेल्वेच्या लोकोपायलटचा राजधानी खाली येऊन मृत्यू

अचानकपणे समोरून राजधानी एक्सप्रेस आली.त्यामुळे गडबडलेला सौराष्ट्र जनता एक्सप्रेस चे लोको पायलट स्लीपर वरून घसरून राजधानी खाली आले. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 23, 2017 09:13 AM IST

रेल्वेच्या लोकोपायलटचा राजधानी खाली येऊन मृत्यू

पालघर,23 ऑक्टोबर: पालघरजवळ काल एका लोको पायलटचा दुर्दैवी अंत झाला. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या सौराष्ट्र जनता एक्सप्रेसचा लोको पॉइलट उमेश चंद्र आर यांचा राजधानी एक्सप्रेसखाली येऊन जागीच मृत्यू झाला.

बोईसर येथे सौराष्ट्र जनता एक्सप्रेस सायडिंगला असताना इंजिन तपासणीसाठी ड्राइवर इंजिन खाली उतरून तपासणी करीत होते. त्या दरम्यान अचानकपणे समोरून राजधानी एक्सप्रेस आली.त्यामुळे गडबडलेला सौराष्ट्र जनता एक्सप्रेस चे लोको पायलट स्लीपर वरून घसरून राजधानी खाली आले. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना सायंकाळी 7 10 च्या सुमारास घडली. यामुळे गाडीमधील बाकीचे लोको पायलट आणि बोईसर येथील रेल्वे स्टाफला धक्का बसला. वलसाडहून नवीन चालक आल्यानंतर गाडी 8:15 च्या सुमारास गुजरातकडे रवाना झाली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले. सध्या चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close