प्लॅस्टिकच्या बंद बाटलीमधलं पाणी पिता? मग सावधान!

प्लॅस्टिकच्या बंद बाटलीमधलं पाणी पिता? मग सावधान!

आता प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पाणी पिणं धोकादायक आहे. न्यूयॉर्कच्या संशोधकांनी बाटलीबंद पाण्यामध्ये प्लॅस्टिकचे कण आढळत असल्याचं म्हटलंय.

  • Share this:

16 मार्च : तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटलीमधलं पाणी पीत असाल तर सावधान! ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पाणी पिणं धोकादायक आहे. न्यूयॉर्कच्या संशोधकांनी बाटलीबंद पाण्यामध्ये प्लॅस्टिकचे कण आढळत असल्याचं म्हटलंय.

बाटलीबंद पाण्याचं उत्पादन करणाऱ्या देशभरातील नावाजलेल्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. जगभरातून जमा केलेल्या बाटलीबंद पाण्याच्या ९० टक्के नमुन्यांमध्ये प्लॅस्टिक आढळलं आहे.

या संशोधकांनी ९ देशात विकल्या जाणाऱ्या ११ ब्रँडच्या २५० बाटलीबंद पाण्याची चाचणी घेतली होती. ज्या नऊ देशांमधील बाटलीबंद पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते, त्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. चीन, अमेरिका, ब्राझील, इंडेनोशिया, केनिया, लेबनॉन,मेक्सिको, थायलंड याही देशांमधील बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.

कोणत्या देशात, कुठल्या ब्रँडच्या पाण्यात किती प्लॅस्टिकचे कण आढळले आहेत?

ब्रँडचे नाव    देशाचे नाव    किती कण आढळले

अॅक्वा           इंडोनेशिया           ४७१३

अॅक्वाफिना       अमेरिका, भारत       १२९५

बिस्लेरी        भारत                ५२३०

डासानी          अमेरिका, केनिया        ३३५

First published: March 16, 2018, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading