Home /News /national /

अवघ्या 2000 रुपयांसाठी वृद्ध प्यायला नाल्याचं पाणी; Shocking Video Viral

अवघ्या 2000 रुपयांसाठी वृद्ध प्यायला नाल्याचं पाणी; Shocking Video Viral

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

    भोपाळ, 16 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) विदिशा जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध नाल्याचा पाणी हातात घेऊन पित असताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका अटीशी संबंधित असून तीन दिवस जुना असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना विदिशा जिल्ह्यातील जावती गावातील आहे. गावातील सरपंचने एक विचित्र अट ठेवली होती. त्याच्या अटीनुसार, गावातून निघणाऱ्या नाल्याचा पाणी पिणाऱ्याला दोन हजार रुपये दिले जातील. यामुळे गावातील वृद्ध पन्नालाल नाल्याचं पाणी पिण्यासाठी गेला. या घटनेचा लोकांनी व्हिडीओदेखील शूट केला. आता तो व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या प्रकरणात कोणीही तक्रार केलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वृद्ध व्यक्ती नाल्याजवळ बसला आहे आणि दोन्ही हातात पाणी भरून घेत आहे. धक्कादायक म्हणजे यावेळी आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला शाबासकी देताना ऐकू येत आहे. यानंतर एक व्यक्ती वृद्धाच्या पाठीवर हात ठेवून दुसरीकडे घेऊन गेला. हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला याबाबत माहिती मिळवली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Video viral

    पुढील बातम्या