मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करणं ठरू शकतं धोकादायक; एक्सपर्ट्सचा इशारा

कोरोना लस घेतल्यानंतर मद्यपान करणं ठरू शकतं धोकादायक; एक्सपर्ट्सचा इशारा

जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे.

जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे.

जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारतात कोरोना लसीकरणाची (Coronavirus vaccination) सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण अभियानाला (PM Narendra Modi) सुरुवात केली. भारतात लस घेतल्यानंतर अधिकृतपणे, मद्यपानासंबंधी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतु जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे. जगभरातील एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, कोरोना लस घेण्याआधी आणि नंतर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. याच सावधगिरी बाळगण्यामध्ये एक मद्यपान आहे. मद्यपानाचा रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्यूनिटीवर वाईट परिणाम होतो. यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमजोर होते. कोरोना लस इम्यूनिटीवरच काम करते. त्यामुळे लस घेण्याआधी आणि लस घेतल्याच्या काही दिवसांनंतरही मद्यपान न करण्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.

(वाचा - Coronavirus Vaccination Drive: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे)

लसीकरणाच्या किती वेळ आधी आणि किती वेळ नंतर मद्यपान करू नये, याबाबत अनेक एक्सपर्ट्सचं वेगवेगळं मत आहे. रशियाच्या हेल्थ एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, स्पुतनिकची लस घेण्याआधी दोन आठवडे आणि लस घेतल्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये. तर, हे वॅक्सिन बनवणारे डॉक्टर अलेक्जेंडर गिन्टबर्ग यांनी, लस घेण्याआधी आणि नंतर तीन दिवसांपर्यंत मद्यपान न करण्याचं सांगितलं आहे.

(वाचा - COVID-19 Vaccination: लस घेतल्यानंतरही सावध राहा; वैज्ञानिकांनी दिला इशारा)

ब्रिटनच्या हेल्थ एक्सपर्ट्सनी, लस घेण्याच्या एक दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर एक दिवसापर्यंत मद्यपान करू नये असं सांगितलं आहे. दरम्यान, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचं मोदी म्हणाले. त्यामुळे मास्क घालून, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केलं आहे.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

पुढील बातम्या