मराठी बातम्या /बातम्या /देश /'भाऊ मुख्यमंत्री, वर्दी उतरवेन', Dream11मध्ये 1 कोटी जिंकलेल्याने दारु पिऊन घातला गोंधळ

'भाऊ मुख्यमंत्री, वर्दी उतरवेन', Dream11मध्ये 1 कोटी जिंकलेल्याने दारु पिऊन घातला गोंधळ

आनंद साजरा करण्यासाठी तो खूप दारू प्यायला. त्यानतंर दारूच्या नशेत गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी आले.

आनंद साजरा करण्यासाठी तो खूप दारू प्यायला. त्यानतंर दारूच्या नशेत गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी आले.

आनंद साजरा करण्यासाठी तो खूप दारू प्यायला. त्यानतंर दारूच्या नशेत गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी आले.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

हरिद्वार, 03 फेब्रुवारी : एखाद्या व्यक्तीला अचानक लॉटरी लागली तर त्याला मोठा आनंद होतो. पण अचानक मिळालेल्या इतक्या पैशांमुळे काहीजण बेभान होतात तर काहीजण योग्य नियोजन करतात. एका व्यक्तीला ड्रीम ११ मध्ये १ कोटी ३५ लाख रुपये मिळाले. इतके पैसे जिंकल्यानंतर त्याने आनंदाच्या भरात इतकी दारू प्यायला की त्यानंतर नशेत गोंधळ घालायला लागला.

ड्रीम ११ मध्ये कोट्यवधी रुपये जिंकल्यानंतर त्याने दारू पिऊन गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तेव्हा पोलिसांसोबतही गैरवर्तन केलं. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुष्कर धामी माझे भाऊ आहेत असं सांगत पोलिसांना निलंबित करण्याची धमकीही द्यायला लागला. यानंतर पोलिसांनी त्याला शांतता भंग केल्या प्रकरणी दंड केला.

हेही वाचा : न्यायाधीशांनी निकाल देण्यासाठी घेतली ChatGPTची मदत, सुनावणीवेळी विचारले प्रश्न

सिडकुल इथं राहणाऱ्या महेश सिंह धामीने ड्रीम ११ मध्ये १ कोटी ३५ लाख रुपये जिंकले. कर कापून घेतल्यानंतर त्याच्या खात्यावर ९६ लाख रुपये आले. याचा आनंद साजरा करण्यासाठी तो खूप दारू प्यायला. त्यानतंर दारूच्या नशेत गोंधळ घालायला सुरुवात केली. अखेर याची तक्रारी पोलिसात करण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तेव्हा पोलिसांना त्याने आपण मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचं सांगितलं. त्यानतंर पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकीही दिली.

पोलिसांनी महेश सिंह धामीला पोलीस स्टेशनला नेलं. त्यावेळीही त्याने रुबाब दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की, गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला पोलिस स्टेशनला आणण्यात आले. तसंच समज देण्यात आली असून शांतता भंग केल्याबद्दल दंड करण्यात आलाय.

First published:

Tags: Cricket, Local18