नवी दिल्ली 10 सप्टेंबर : देशाच्या संरक्षण व्यवहार मंत्रिमंडळ समितीने हवाई दलासाठी (Indian Air Force) 6 नवीन एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW & C) विमानांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आहेत. 11 हजार कोटींचा हा प्रकल्प संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) तयार केला होता.
'काँग्रेसची अवस्था जमीन नसलेल्या जुन्या जमीनदारासारखी', पवारांचं रोखठोक विधान
स्वदेशी बनावटीची पहिली AEW & C प्रणाली भारतीय वायुसेनेने 2017 मध्ये समाविष्ट केली. ही प्रणाली ब्राझीलच्या एम्ब्रायर -145 जेटवर आधारित होती. नेत्रा AEW & C नावाची ही प्रणाली DRDO ने विकसित केली आहे आणि त्याची रेंज सुमारे 200 किमी आहे. नवीन AEW&C प्रणाली एअरबस A321 वर आधारित असेल आणि ती नेत्रा प्रणालीपेक्षा अधिक प्रगत असेल अशी अपेक्षा आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या अहवालानुसार, सध्या दोन नेत्र प्रणाली सेवेत आहेत. डीआरडीओ एअर इंडियाकडून ही 6 विमाने घेणार आहे. ही विमाने बदलली जातील आणि एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीमसोबत (AEW & C) फिट केली जातील.
परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध CAIT नं थोपटले दंड; ‘हल्ला बोल ई-कॉमर्स’ अभियान
खरं तर, AEW आणि C प्रणाली आकाशात उडणाऱ्या सर्व वस्तू शोधू शकते, ज्यात जमिनीवर आधारित रडारपेक्षा खूप वेगवान असणारी क्रूझ क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, दुसऱ्या बाजूने येणारे ड्रोन आहेत. तसेच त्यांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. ही यंत्रणा समुद्रातही नजर ठेवू शकते आणि जहाजांच्या सुरक्षेसाठी काम करू शकते.
भारतीय हवाई दलासाठी नवीन ट्रान्सपोर्टर विमानांच्या खरेदीला कॅबिनेटकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. भारतीय हवाई दलाच्या जुन्या विमानांची जागा नवीन, प्रगत आणि आधुनिक विमानांनी घेण्याची प्रक्रिया सतत चालू आहे. भारतीय हवाई दलात बऱ्याच काळापासून सेवा देणारे अव्रो आता स्पेनच्या C-295MW ची जागा घेतील.
56 नवीन C-295MW विमाने खरेदी करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या 56 विमानांपैकी 16 विमाने पूर्णतः स्पेनमधून फ्लायवेच्या स्थितीत तयार केली जातील म्हणजेच थेट स्पेनमधून उड्डाण केली जातील. तर उर्वरित 40 विमानं परवाना अंतर्गत भारतात तयार केली जातील. या नवीन विमानाची वजन उचलण्याची क्षमता 5 ते 10 टन आहे. या विमानात पॅरा ड्रॉप सैनिक आणि मालवाहतुकीसाठी मागील उताराचा दरवाजा आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, 16 विमाने 48 महिन्यांच्या आत स्पेनमधून येतील, उर्वरित 40 विमान पुढील दहा वर्षांत भारतात तयार होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Narendra modi