Elec-widget

शत्रूला धडकी भरवणारं क्षेपणास्त्र! ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूजची यशस्वी चाचणी

शत्रूला धडकी भरवणारं क्षेपणास्त्र! ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूजची यशस्वी चाचणी

जगातील सर्वोत्तम अशा सुपरसोनिक क्रूज मिसाइलची निर्मिती भारत आणि रशियाने केली आहे. क्षेपणास्त्राचे ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मस्कवा नदीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ओडिसातील चांदीपूर रेंजमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे असं क्षेपणास्त्र आहे जे जमिन, हवा आणि पाणी तिनही ठिकाणाहून डागता येतं. जगातील सर्वोत्तम असं हे क्षेपणास्त्र असून अचुक मारा करण्याची क्षमता हे त्याचं खास वैशिष्ठ्य आहे.

सध्या ब्रह्मोस सारखं क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तान यांच्याकडेदेखील नाही. सध्या भारत आणि रशिया या क्षेपणास्त्राची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्तीजास्त पल्ल्याचे लक्ष्य भेदण्याचे आणि हायपरसोनिक वेगाने उड्डाण होण्यासाठी काम सुरू आहे.

ब्रह्मोस 290 किमी अंतरापर्यंतचे लक्ष्य अचूक गाठू शकते. आता ते वाढवून 600 किलोमीटर इतकं गाठण्यासाठी भारत आणि रशिया संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. यामुळे फक्त पाकिस्तानच नाही तर कोणतंही टार्गेट या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने क्षणात उद्ध्वस्त करता येईल.

Loading...

कमी अंतरावरील ब्रह्मोसमध्ये रॅमजेट इंजिन असून हे सुपरसोनिक क्रूज मिसाइल आहे. पाणबुडी, जहाज, लढाऊ विमान किंवा जमीनीवरून या क्षेपणास्त्राचा मारा करता येतो. ब्रह्मोस क्षेपणास्त्र दिवसा किंवा रात्री तसेच कोणत्याही ऋतूत मारा करू शकते. रॅमजेट इंजिनच्या मदतीने क्षेपणास्त्राची ताकद तिप्पट वाढवता येते.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मस्कवा नदीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राचा वेग हा आवाजाच्या गतीच्या तीन पटीने जास्त आहे. या क्षेपणास्त्राचा मारा इतका जबरदस्त आहे की, शत्रूला सावध व्हायलादेखील वेळ मिळत नाही.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: DRDO
First Published: Sep 30, 2019 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...