नवी दिल्ली 07 सप्टेंबर: भारताच्या संरक्षण क्षेत्रात मंगळवारी DRDOने ऐतिहासिक कामगीरी केली आहे. Hypersonic air-breathing scramjet technologyचं परीक्षण करण्यात आलं आहे. जगातल्या अतिशय मोजक्याच देशांजवळ हे तंत्रज्ञान आहे. स्क्रॅमजेट हाइपरसॉनिक स्पीड फ्लाइटची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे भारत आता हाइपरसॉनिक क्रुज मिसाइल प्रणाली तयार करू शकणार आहे.
Hypersonic Technology Demonstrator Vehicle म्हणजेच हे मानवरहीत विमान वाऱ्याच्या वेगापक्षाही जास्त गतीने उड्डणा करू शकतं. तासाला 12 हजार किलोमीटरपर्यंत वेगाने जाण्याची त्याची क्षमता आहे. या विमानातून क्षेपणास्त्र डागता येऊ शकतात. जगातल्या प्रगत अशा मोजक्याच देशांकडे ही क्षमता असून याचा प्रयोग यशस्वी झाला तर शत्रूला धडकी भरविण्याची क्षमता भारताकडे येणार आहे.
ओडिशामधल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरच्या लाँच पॅड वरून या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. Hypersonic Technology Demonstrator Vehicleच्या यशस्वी प्रयोगानंतर आता ते तंत्रज्ञान वापरून विमान तयार केलं जाणार आहे.
#WATCH DRDO‘s successful demonstration of the Hypersonic air-breathing scramjet technology with the flight test of Hypersonic Technology Demonstration Vehicle, at 1103 hours today from Dr. APJ Abdul Kalam Launch Complex at Wheeler Island, off the coast of Odisha pic.twitter.com/aC1phjusDH
— ANI (@ANI) September 7, 2020
संरक्षणाच्या दृष्टीने हे यश अतिशय महत्त्वाचा टप्पा राहणार असून इतर क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाची चाचणी घेतल्यानंतर त्या विमानावर रडार आणि इतर उपकरणाच्या साह्याने लक्ष ठेवण्यात आलं होतं. आता त्याचा डेटा जमा केला जाणार असून त्याचं विश्लेषण करून काही माहितीही मिळवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.