तुमच्याजवळील वस्तू 'या' ड्रॉवरमध्ये टाका आणि व्हायरसमुक्त करा

तुमच्याजवळील वस्तू 'या' ड्रॉवरमध्ये टाका आणि व्हायरसमुक्त करा

DRDO ने एक विशेष असं यूव्ही कॅबिनेट (UV cabinet) तयार केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) तुम्ही स्वत:चा बचाव करण्यासाठी हात धुवत आहात, मास्क वापरत आहात. मात्र तुमच्याजवळील पैसे, चावी, मोबाइल आणि लॅपटॉप अशा वस्तूंवरही कोरोनाव्हायरस असू शकतो. मात्र या सर्वच वस्तू डिसइन्फेक्ट करणं शक्य नाही. मात्र आता ते शक्य होणार आहे. अशा वस्तू व्हायरसमुक्त करण्यासाठी एक विशेष असं ड्रॉवर तयार करण्यात आलं आहे.

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) एक एल्ट्रावॉयलेट लाइटवर आधारित कॅबिनेट तयार केलं आहे. ज्यात तुम्ही मोबाइल, लॅपटॉप, पैसे, कागद किंवा इतर अशा वस्तू ठेवून काही वेळातच व्हायरसमुक्त करू शकता.

हे कॅबिनेट कॉन्टॅक्टलेस आहे. म्हणजे त्याला खोलण्यासाठी हातांची गरज नाही तर बटणमार्फत ते उघडलं जाईल. यात ठेवलेल्या सामानावर अल्ट्रावॉयलेट लाइट्स पडून त्यांचं सॅनिटायझेशन होतं. सॅनिटायझेशन झाल्यानंतर हा कॅबिनेट आपोआप स्लीप मोडमध्ये जातो.

याआधी डीआरडीओने यूव्ही ब्लास्टर हे डिसइन्फेक्ट टॉवरही तयार केलं आहे. ज्यामध्ये 12 बाय 12 ची रूम 10 मिनिटांत व्हायरसमुक्त करण्याची क्षमता आहे. 400 स्केवअर फिटचं क्षेत्र 30 मिनिटांत व्हायरसमुक्त करेल. हा यूव्ही ब्लास्टर टॉवर मॉल, मेट्रो, हॉटेल, कारखाने आणि ऑफिस अशा ठिकाणी वापरता येऊभ शकतो. याला वायफायमार्फतही चालवलं जाऊ शकतं.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - घड्याळ, बेल्ट आणि शर्टची बटणंही ओळखू शकणार कोरोनाची लक्षणं!

First published: May 11, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या