मराठी बातम्या /बातम्या /देश /पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता; आता मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ

पंक्चर काढायचं काम करायचा हा नेता; आता मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ

साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दलित नेत्याला मोदींनी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. मतदारसंघात ते स्कूटरवर फिरून माहिती घेत असत. गरिबीतून वर आलेल्या उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी ते एक असतील.

साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दलित नेत्याला मोदींनी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. मतदारसंघात ते स्कूटरवर फिरून माहिती घेत असत. गरिबीतून वर आलेल्या उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी ते एक असतील.

साधेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दलित नेत्याला मोदींनी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. मतदारसंघात ते स्कूटरवर फिरून माहिती घेत असत. गरिबीतून वर आलेल्या उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी ते एक असतील.

  नवी दिल्ली, 7 जुलै: बुधवारचा दिवस मोदी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर (Modi 2.0) प्रथमच नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinate Expansion) झाला. एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एक नाव भाजपचे खासदार डॉ. वीरेंद्र कुमार  (Dr Virendra Kumar) यांचं आहे. 6 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आलेले मध्य प्रदेशातले नेते एवढीच वीरेंद्र कुमार यांची ओळख सांगून चालणार नाही. मोदींच्या खास मर्जीतल्या आणि गरिबीतून वर आलेल्या दलित भाजप नेत्यांपैकी ते एक आहेत. एके काळी वडिलांच्या सायकलच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करणारे दलित नेते आता नव्या मंत्रिमंडळात सामील होतील. याअगोदर लोकसभेच्या सभापतिपदी Protem Speaker म्हणून त्यांची तात्पुरती नियुक्ती झाली होती. आता खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या जबाबदारीचं काम मिळण्याची शक्यता आहे.

  गरिबीतून वर आलेलं नेतृत्व, संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि दलित नेते असणारे डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या वडिलांचं सायकल दुरुस्तीचं दुकान होतं.  आता उच्चशिक्षित असलेले वीरेंद्र कुमार पूर्वी तिथे पंक्चर काढायचं काम करायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत ते वर आले आहेत. वीरेंद्र कुमार खटिक असं त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्या साधेपणासाठी ते ओळखले जातात. त्यांच्यामुळे दलित नेतृत्वावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेशच्या बुंदेलखंडमध्ये वीरेंद्र कुमार बडे नेते आहेत.

  साधेपणासाठी प्रसिद्ध

  1996 मध्ये पहिल्यांदा मध्य प्रदेशातल्या सागर या मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे, पण वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना स्वकष्टाने उच्चशिक्षण घ्यावं लागलं. वीरेंद्र खटिक शाळा- कॉलेजमधून घरी आल्यावर वडिलांच्या सायकलच्या दुकानात कामाला जात. तिथे दिवस-रात्र कष्ट करून शिवाय अभ्यासासाठीही त्यांना वेळ काढावा लागत असे.

  बड्या मंत्र्यांनी केली खुर्ची रिकामी, महाराष्ट्रातील नेत्यांचाही समावेश

  असंच कष्टाने शिकत त्यांनी सागरमधल्या प्रसिद्ध डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केलं आणि नंतर बालमजुरी अर्थात Child labour संबंधी विषयात डॉक्टरेट PhD  मिळवली.  कॉलेजमध्ये असतानाच 1975 मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनात ते सक्रिय झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध पूर्वीपासूनच होता. संघाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते.

  स्कूटर हीच ओळख

  अजूनही वीरेंद्रकुमार खटीक दिल्लीत आले की, सामान्य माणसाप्रमाणे ट्रेन स्टेशन किंवा एअरपोर्टवरून कॅब किंवा ऑटोची वाट पाहतात, असं त्यांना ओळखणारे सांगतात. मध्य प्रदेशातून खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्या वेळीही त्यांच्याकडे एक जुनी स्कूटर होती.

  Modi Government reshuffle: नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक शिवसेनेला शह देणार?

  त्या स्कूटरवरूनच ते मतदारसंघात फिरत असत. ती स्कूटर त्यांची ओळख होती. पुढे अनेक वर्षं हेच वाहन त्यांनी वापरलं. सहा वेळा निवडणूक जिंकून खासदार झाले तरी त्यांनी अजून साधी राहणी सोडलेली नाही, असं त्यांना जवळून ओळखणारे सांगतात.

  First published:
  top videos

   Tags: Madhya pradesh, Modi government, Narendra modi