Home /News /national /

Big News! काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉक्टरांची मुख्यमंत्रिपदी वर्णी

Big News! काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉक्टरांची मुख्यमंत्रिपदी वर्णी

साहा यांनी बिप्लब कुमार देब यांची जागा घेतली आहे. ज्यांनी त्रिपुरामधील 25 वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवून 2018 मध्ये भाजपला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. आता साहा यांच्यासमोर 2023 च्या निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्याची कठीण कामगिरी असणार आहे.

पुढे वाचा ...
    आगरतळा, 14 मे : त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष माणिक साहा (Dr. Manik Saha) हे ईशान्येकडील राज्य त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. ते आता भाजपच्या बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांची जागा घेतील. साहा हे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी 2016 मध्ये भाजपप्रवेश केला होता. त्यांना 2020 मध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. आता त्यांना मुख्यमंत्री पदावर संधी देण्यात आली आहे. राज्य निवडणुकीच्या अवघ्या वर्षभरापूर्वी देब यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी साहा यांना भाजप विधिमंडळ पक्षाचे नेतेपद देण्यात आले. साहा हे शिक्षणाने डॉक्टर असून ते दंतचिकित्सक आहेत. ते त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही (Tripura Cricket Association) आहेत. मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यापूर्वी साहा हापानिया येथील त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत असत. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्रिपुरातून राज्यसभेची एकमेव जागा जिंकली होती. हे वाचा - LeT च्या दहशतवाद्याला अटक; सुरक्षा दल, VIP वर हल्ला करण्याचा आखत होता कट मागील काही वर्षांत देशभरात भाजप आणि पंतप्रधान मोदींची लाट असल्याची चर्चा आहे. यामध्ये अनेक बडे काँग्रेस नेते भाजपवासी झाले आहेत. भाजपकडूनही त्यांना अनेक चांगल्या संधी मिळत आहेत. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्येही सध्या भाजपची सत्ता असून मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) हेही आधी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी 2015 मध्ये भाजपप्रवेश केला. याशिवाय, देशभरात अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये गेले आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनीही 2020 मध्ये भाजपप्रवेश केला होता. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे तृणमूल काँग्रेसचे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) 2021 मध्ये भाजपमध्ये गेले. काँग्रेससह देशभरात इतरही राजकीय पक्षांना गळती लागली असून महत्त्वाचे नेते भाजपमध्ये जात आहेत. हे वाचा - तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून पोलिसांपासून बचावासाठी बनला साधू, अशी झाली पोलखोल देब यांच्या राजीनाम्यामुळे साहा यांना मुख्यमंत्रीपद मिळून ते प्रकाशझोतात आले आहेत. ज्यांनी त्रिपुरामधील 25 वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवून 2018 मध्ये भाजपला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. साहा यांनी बिप्लब कुमार देब यांची जागा घेतली आहे. आता साहा यांच्यासमोर 2023 च्या निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करण्याची कठीण कामगिरी असणार आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या