Home /News /national /

EXCLUSIVE : खडतर प्रवासानंतर महाराष्ट्राच्या रणरागिणीने मिळवलं लष्करात मानाचं पद

EXCLUSIVE : खडतर प्रवासानंतर महाराष्ट्राच्या रणरागिणीने मिळवलं लष्करात मानाचं पद

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल होण्याचा मान पटकावणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर यांनी News18 lokmat ला दिलेली विशेष मुलाखत.

नवी दिल्ली, 04 मार्च: 'लहानपणापासून महिलेचा आदर करावा हे शिकवण्याची समाजाला गरज असल्याचं', मत पहिल्या मराठी महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी मांडलं. "मुली मुलांपेक्षा कमी नाहीत असं म्हणताना दुसरीकडे मुलंदेखील मुलींपेक्षा कमी नसल्याचं त्यांना सांगितलं पाहिजे. जेव्हा पुरुषाला वाटेल पत्नीने शिकून घरी बसू नये तेव्हाचं समाजामध्ये बदल होऊ शकतो", असं लेफ्ट. जन कानिटकर News18 Lokmat ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाल्या. पती आणि पत्नी दोघेही लष्करात आणि दोघेही लेफ्टनंट जनरलपदापर्यंत असं भारतीय लष्करात बहुधा प्रथमच घडलं असावं. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब देशातील तिसऱ्या महिला लष्करी अधिकारी बनण्याचा मान डॉ. माधुरी कानिटकर यांना मिळाला आहे. लष्करी अधिकारी ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. या खडतर मार्गावर आपल्या आजीला आदर्श मानून त्यांनी हा बहूमान मिळवलाय.त्यांचे वडील रेल्वेत असल्यानं त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या भागात झालं. मात्र शाळेत घातलेला युनिफ्रॉर्म पुढे कॉलेज आणि आता लष्करात देखिल त्यांनी घातला. 37 वर्षापासून हा युनिफ्रॉम कधीचं न काढल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल पदापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक वळणावर पतीनं साथ दिल्याचं डॉ. माधुरींनी सांगिलत आहे. वाचा - रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ? चाहत्यांवर रागावणं पडलं महागात त्यांचे पती एनडीएमध्ये होते. दोघांच्याही पोस्टिंग नेहमीच वेगळ्या ठिकाणी असायच्या पती कधी नॉर्थ तर डॉ. माधुरी साऊथला असायच्या असा कठिण प्रसंगांवर मात करत त्यांनी हा यशाचं शिखर गाठलं आहे. असा विक्रम पहिल्यांदाच काही वर्षापूर्वी त्यांनी महिलांसाठी सेमिनार घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. जसंजसं मुलींना प्रोत्साहन मिळेल तस सर्वच क्षेत्रात मुलींची संख्या वाढेल. सर्वांनीचं बॉर्डवर जावं अस काही नाही पण मुली जेव्हा या क्षेत्रात येतील तेव्हा सुविधा देखिल वाढतील असं मत डॉ. माधुरींनी मांडलं आहे. जेव्हा पती-पत्नी दोघेही लष्करात असतात त्यावेळी येणाऱ्या कठीण प्रसंगांविषयी डॉ. माधुरींना सांगितल आहे. त्या वेळेस विमानाची कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे पोस्टिंगच्या ठिकाणी जाणं कठिण होत होतं. त्या वेळी फोन, इंटरनेट नव्हते. अशावेळी कधीतरी पती रूग्णलयातील मिल्ट्री फोनवरती फोन करायचे. मात्र त्यांना मुलीसोबत बोलता यायचं नाही अशा वेळी मुलगी रडायची. तिची अनेकदा समजूत घालावी लागायची. अशा अनेक कडू-गोड आठवणी डॉ. माधुरींनी न्यूज18 लोकमतशी बोलतांना सांगितल्यात. पण पती आणि पत्नी दोघेही लष्करात आणि दोघेही लेफ्टनंट जनरलपदापर्यंत पोहोचलेले पहिले पती-पत्नी ठरले आहे. भारतीय लष्कराच्या इतिहासात असा अनोखा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे की नवरा आणि बायको दोघेही लष्करात आणि दोघेही लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत स्वत: च्या कर्तृत्वाने पोहोचले. आपल्या आयुष्यातल्या खडतर मार्गावर मात करत डॉ. माधुरी आता लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहचल्या आहेत. लाखो मुलींसाठी रोल मॉडेल बनलेल्या महाराष्ट्राच्या या हिरकणीला न्यूज18 लोकमतच्या शुभेच्छा! अन्य बातम्या मन हेलावून टाकणारी ती 13 मिनिटं, काजोलचा हा VIDEO एकदा पाहाच देवा तुझ्या दारी आले, स्कुटी घेऊन तरुणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात, पाहा हा VIDEO
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Indian army, World woman's day

पुढील बातम्या