डॉ. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, हत्याप्रकरणातील मोठा खुलासा

कलबुर्गी यांच्या पत्नी उमा देवी आणि साक्षीदाराने मारेकऱ्यांना ओळखलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 11:50 AM IST

डॉ. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, हत्याप्रकरणातील मोठा खुलासा

संदीप राजगोळकर, धारवाड, 21 जुलै : कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. गणेश मिस्कीन आणि प्रवीण चतुर या दोघांनी कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी माहिती समोर आली आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमा देवी आणि साक्षीदाराने मारेकऱ्यांना ओळखलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कलबुर्गी हत्याप्रकरणी कर्नाटक एसआयटीच्या तपासामध्ये महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी चोरीची दुचाकी वापरल्याचीही माहिती समोर आली आहे. आरोपींची ओळख पटल्याने आता या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. 30 ऑगस्ट 2015 रोजी डॉ. एम एम कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयित आरोपीला बेळगावातून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन 27 वर्षीय प्रवीण प्रकाश चतुरला अटक केली होती. कलबुर्गी हत्या प्रकरणातील पहिली अटक असून अमोल काळे याच्या जबाबातून प्रवीणचं नाव समोर आलं. गौरी लंकेश हत्येनंतर कलबुर्गी हत्येमागे बेळगाव कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय होता.

तुम्ही मासांहारी आहात? मग पाहा हा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...