मराठी बातम्या /बातम्या /देश /नव्या मंत्र्यांच्या शपथविधीआधी राजीनाम्यांना जोर, ‘या’ मंत्र्यांनीही रिकामी केली खुर्ची

नव्या मंत्र्यांच्या शपथविधीआधी राजीनाम्यांना जोर, ‘या’ मंत्र्यांनीही रिकामी केली खुर्ची

नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी सध्या खांदेपालट करण्याचं धोरण मोदी सरकारनं अवलंबलं असल्याचं चित्र आहे. याचाच भाग म्हणून आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यासह इतरही अनेक मंत्र्यांनी खुर्च्या रिकाम्या केल्याचं दिसून येत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 7 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंत्रिमंडळाचा (cabinet) शपथविधी (Swearing in) बुधवारी (Wednesday) रात्री पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जशी नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगली आहे, तशीच आता जुन्या चेहऱ्यांच्या गच्छंतीची चर्चादेखील रंगू लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsha Vardha) यांनी काही वेळापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. कोरोना काळात सर्वाधिक टीकेचं लक्ष्य ठरलेलं आरोग्य मंत्रालय सांभाळणाऱ्या डॉ. हर्ष वर्धन यांच्या राजीनाम्यामुळे आणखी एक मंत्रीपद रिक्त झालं आहे.

राजीनाम्याचे सत्र जोरदार

नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी सध्या खांदेपालट करण्याचं धोरण मोदी सरकारनं अवलंबलं असल्याचं चित्र आहे. याचाच भाग म्हणून आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यासह इतरही अनेक मंत्र्यांनी खुर्च्या रिकाम्या केल्याचं दिसून येत आहे. रमेश पखरियाल, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, सदानंद गौडा या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यापूर्वी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची राज्यपालपदी बढती करून त्यांची जागाही रिकामी करण्यात आली होती. तर शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रेंच्या राजीनाम्यामुळे मंत्रीमंडळातील आणखी एक खुर्ची रिकामी झाली आहे.

हे वाचा -BREAKING : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, ईडीने केली जावयाला अटक

पहिलाच मंत्रीमंडळ विस्तार

2019 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मोदी सरकारने आतापर्यंत एकदाही कॅबिनेटचा विस्तार केलेला नाही. त्यामुळे हा मोदी मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं प्रादेशिक समतोल साधणं आणि घटकपक्षांना खुश करण्याच्या प्रयत्नात सध्या भाजप असल्याचं चित्र आहे. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होत असल्याचं चित्र आहे. भाजपमधील अद्याप मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणारे नेते आणि एनडीएच्या घटकपक्षांतील भाजपला कुठल्या ना कुठल्या स्वरुपाची मदत केलेले नेते यांचा या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांना दिल्लीहून फोन यायला सुरुवात झाली होती. मंत्रिपदाचे सर्व संभाव्य उमेदवार सध्या दिल्तीमध्ये दाखल होणार असून अद्यापही अनेकांच्या समावेशाबाबत दिल्लीतील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: Delhi, Union cabinet