मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona: नाईट, विकेण्ड कर्फ्यूचा उपयोग नाही, देशात कडक लॉकडाऊनची गरज; जाणकारांनी सांगितलं कारण

Corona: नाईट, विकेण्ड कर्फ्यूचा उपयोग नाही, देशात कडक लॉकडाऊनची गरज; जाणकारांनी सांगितलं कारण

दिल्लीतील प्रसिद्ध एम्स (AIIMS) रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी देशातील कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave in India) थांबविण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे काटेकोर व पूर्ण टाळेबंदीची मागणी केली आहे. ज्या भागात 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना संक्रमण आहे तिथे कडक टाळेबंदी (India Lockdown) करणं आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 2 मे : दिल्लीतील प्रसिद्ध एम्स (AIIMS) रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी देशातील कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave in India) थांबविण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे काटेकोर व पूर्ण टाळेबंदीची मागणी केली आहे. ज्या भागात 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना संक्रमण आहे तिथे कडक टाळेबंदी (India Lockdown) करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, देश कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अडकला आहे आणि हा विषाणू वेगाने पसरत आहे, त्याचा वाढता वेग भीतीदायक आहे. उत्तर प्रदेश (UP Corona), महाराष्ट्र (Maharashtra Corona), हरियाणा (Hariyana) आणि इतर राज्यांनी रात्रीची संचारबंदी आणि शनिवार व रविवार टाळेबंदी सारख्या तरतुदी करून पाहिल्या असल्या तरी दुसरी लाट थांबविण्यात हे उपाय अकार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे आणि मानवी संसाधनावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे आहे. हे का होत आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, की सध्या संसर्गाचं प्रमाण कमीच होत नाही, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आपल्याला आक्रमकपणे कार्य करण्याची गरज आहे. एकतर आक्रमकपणे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करावी लागतील किंवा सरळ टाळेबंदी करणे किंवा जे काही करावे लागेल ते करणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील टाळेबंदी एक आठवड्यासाठी वाढविली. केजरीवाल म्हणाले, की दिल्लीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 30 टक्क्यांहून अधिक आहे. कडक टाळेबंदी लागू करण्याची नितांत गरज असल्याचे सांगत गुलेरिया यांनी दुसऱ्यांदा टाळेबंदी लावण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. मधल्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घटली होती आणि लसही येत आहे, असे वाटल्याने सर्वजणच कोरोनाविषयी निष्काळजी राहिले. परंतु, कोरोना विषाणूच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. जंगलाला लागलेल्या आगीप्रमाणे भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. सध्या प्रतिकारशक्ती चांगली असण्यावर भर दिला जात असला तरी कोरोना विषाणूच्या स्वरुपात बदल होत जाऊन तो अधिक घातक बनला तर चांगली प्रतिकारशक्ती असणाऱ्यांवरही तो हल्ला करू शकतो. देशात कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नवीन रुग्णांसाठी बेड तयार करण्यासाठी रुग्णालयांकडे वेळही नाही आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना वेळ मिळेना झाला आहे, अशी स्थिती आहे. दरम्यान, शनिवारी देशात सरकारी आकडेवारीनुसार कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या तीन लाखाहून अधिक आहे. देशात आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 32 लाखांवर गेली आहे. कोरोना संसर्गाची 4,01,993 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या 1,91,64,969 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 2,11,853 झाला आहे.
First published:

Tags: AIIMS, Corona spread, Lockdown

पुढील बातम्या