S M L

आज देशभरात 127व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन

हा दिवस 'समता दिन' आणि 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 14, 2018 09:14 AM IST

आज देशभरात 127व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन

14 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. आंबेडकर जयंती हा भारतातला एक मोठा उत्सव आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस भारतासह जगभरातल्या ६५ पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. हा दिवस 'समता दिन' आणि 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो.

जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या बाबासाहेबांना 'समतेचं आणि 'ज्ञानाचं प्रतिक' सुद्धा मानलं जातं. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचं आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात. आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' ही त्यांच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केली जाते.

करोडो उपेक्षितांचे उद्धारकर्ते बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी, मुंबईच्या चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आज दिवसभरात येणार आहेत.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आणि राजकिय नेते चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.

आज दुपारी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना खासदार राहुल शेवाळे चैत्यभूमीवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 09:14 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close