मराठी बातम्या /बातम्या /देश /

हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याला केरळ सरकारचा दणका, काढलं नोकरीवरून

हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याला केरळ सरकारचा दणका, काढलं नोकरीवरून

आजही लोक सुशिक्षित झाले तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. कायदा केल्यानंतरही हुंडा घेणाऱ्यांना चाप बसलेला नाही.

आजही लोक सुशिक्षित झाले तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. कायदा केल्यानंतरही हुंडा घेणाऱ्यांना चाप बसलेला नाही.

आजही लोक सुशिक्षित झाले तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. कायदा केल्यानंतरही हुंडा घेणाऱ्यांना चाप बसलेला नाही.

तिरुअनंतपुरम, 07 ऑगस्ट: लग्नासाठी हुंडा घेणं आणि तो न दिल्यावर पत्नीचा बळी घेणं ही प्रथा भारतात अनेक वर्षांपासून आहे. आजही लोक सुशिक्षित झाले तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. कायदा केल्यानंतरही हुंडा घेणाऱ्यांना चाप बसलेला नाही. पण केरळ सरकारने हुंडा (Dowry)मागणाऱ्या आणि त्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला सरकारी नोकरीतून काढलं असून त्याला पुन्हा सरकारी नोकरी मिळणार नाही अशीही तरतूद केली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

त्याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 30 वर्षांचा एस. किरण कुमार हा कोल्लममधील RTO मध्ये असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर या पदावर काम करत होता. त्याची पत्नी विस्मया (24 वर्षं) ही बीएएमएसची (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) विद्यार्थिनी होती. 21 जून 2021ला तिचा मृतदेह आढळून आला. किरण आणि त्याच्या कुटुंबियांनी विस्मयाच्या कुटुंबाकडे हुंडा मागितला होता आणि तो आणण्यासाठी ते तिचा छळ करत होते. तिचा पती किरण याचा तिच्या हत्येमध्ये हात असल्याचा पोलिसांना संशय होता.

लसीकरणात भारतानं ओलांडला 50 कोटींचा टप्पा; PM मोदींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

किरण याला सरकारी नोकरीवरून काढून टाकल्याचा निर्णय केरळचे वाहतूक मंत्री अँटोनी राजू यांनी जाहीर केला. ते म्हणाले, ‘हुंडाबळीसाठी एखाद्या सरकारी खात्याने आपल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची ही केरळ राज्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. ही शिक्षा कठोर आहे त्यामुळेच भविष्यात कुणी अशी चूक करायला धजावणार नाही. किरण याने केरळ सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1960 अंतर्गत सेक्शन 11(1) (viii) (Kerala Civil Services (Classification, Control & Appeal) Rules 1960 under section 11 (1) (viii)) या कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

केरळमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनासंबंधी नियमांतील 93 (c) नुसार त्याने हुंडा घेणं हा गुन्हा आहे. किरणला 22 जूनला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याच्या नावे मेमो काढला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची विभागस्तरीय चौकशी करण्यात आली. त्यात साक्षीदारांच्या जबाबावरून किरण यानेच विस्मयाची हत्या केल्याचं सिद्ध झालं. त्याबाबत कुठलीही शंका राहिली नाही. त्यामुळे वाहतूक खात्याने किरण याच्यावर कारवाई केली.’ ‘कोल्लम जिल्ह्यातील निलामेल इथं विस्मयाचे कुटुंबीय राहता त्यांची भेट घेऊन मी त्यांचं सांत्वन करणार आहे,’ असंही मंत्री राजू यांनी स्पष्ट केलं. हुंडा घेतल्यावर कठोर शिक्षा देण्यात आली तर तसं करणाऱ्यांच्या मनात नक्कीच धाक निर्माण होईल. केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयाचं देशातील इतर राज्यांनी अनुपालन करायला हवं.

First published:

Tags: Kerala